"मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर योगींची खुर्ची जाणार"; 'या' बड्या नेत्याचा खळबळजनक दावा
यंदाच्या लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असताना उत्तर प्रदेशात राजपूत समुदाय भारतीय जनता पार्टीवर नाराज असल्याच्याही चर्चा आहेत. आता याच समुदायाच्या एका नेत्याने प्रतिक्रिया दिली आहे. जर नरेंद्र मोदी पुन्हा प्रचंड बहुमताने सत्तेत आले तर उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांची खुर्ची राहणार नाही असा दावा त्यांनी केला आहे.
भारतीय किसान युनियन भानुचे राष्ट्रीय अध्यक्ष भानुप्रताप सिंह म्हणाले की मी भाजपचा समर्थक राहीलो आहे. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकांमध्ये मी भाजपलाच मत दिले आहे. मात्र आता मी त्यांच्या विरोधात उभा आहे. मी राजीव गांधी यांच्याकडूनही माझे म्हणणे मान्य करवून घेतले होते. मात्र या पंतप्रधानांनी मला एक मिनीट वेळ दिला नाही. कारण मोदी आणि अमित शहा यांचा क्षत्रीय नेत्यांना विरोध आहे. त्या लोकांशी यांना काही देणेघेणे नाही.
आताही क्षत्रीयांच्या राजकारणाचा अभ्यासक असणाऱ्या एका व्यक्तीने मला सांगितले की जर मोदी पुन्हा बहुमताने सत्तेत आले तर आठ दिवसांच्या आता बाबांची खुर्ची जाईल. त्यामुळेच योगी बाबांना मुख्यमंत्रिपदी कायम ठेवण्यासाठी यांना पराभूत करायचा विचार आमच्या डोक्यात आला आहे.
भाजपला क्षत्रीयांची भागिदारी कमी करायची असल्यामुळे अनेकांची तिकिटे त्यांनी कापली आहे. व्ही. के. सिंह यांचे तिकिट कापण्यात आले. नरेंद्र सिंह तोमर यांना पदावरून हटवण्यात आले. राजा रमण सिंह यांना हटवले. मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान यांना त्यांनी हटवले.
राजस्थानातही त्यांनी तसेच केले. आता अजून काय करणार आहेत ते? क्षत्रीय समाज पूर्णपणे यांच्या विरोधात उभा झाला आहे असे भानूप्रताप सिंह म्हणाले. ते मेरठच्या सरधना येथे बोलत होते. येथे क्षत्रीय समाज भाजपच्या विरोधात उभा राहीला असल्याचे दिसते आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.