Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

डॉ. अनुजा मासुले यांना पीएचडी

डॉ. अनुजा मासुले यांना पीएचडी

सांगली:  स्तनाच्या कॅन्सरमध्ये उपचारांसाठी ज्या रसायनांचा वापर केला जातो त्याचे गंभीर परिणाम आरोग्यावर दिसून येतात. यावर एक प्रभावी घटक आणि नवीन प्रणाली म्हणजे मोलेकुलर डॉकिंग स्टडी वापरुन, नवीन रसायन तयार करुन त्याचा प्रभाव कॅन्सर सेल लाईन वरती तपासणे या अत्यंत महत्वाच्या विषयामध्ये डॉ. अनुजा अतुल मासुले यांनी संशोधन केले असून त्यात त्यांना पीएचडी प्राप्त झाली. त्या डॉ. शिवाजीराव कदम फार्मसी कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापिका असून सुरेश ज्ञान विहार जयपुर विद्यापीठातून त्यांनी पीएचडी प्राप्त केली. त्यांना डॉ. प्रिती खुलबे, डॉ. चंद्रकांत मगदूम, प्राचार्य डी.डी.चौगुले, प्राचार्य किरण वाडकर यांचे मार्गदर्शन लाभले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.