Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लग्नपत्रिका पाहून पोलीस हदरले,नवरदेवाविरोधात गुन्हा :, असं छापलंय तरी काय? वाचा

लग्नपत्रिका पाहून पोलीस हदरले,नवरदेवाविरोधात गुन्हा :, असं छापलंय तरी काय? वाचा 



हैदराबाद : सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे गेले काही दिवस सोशल मीडियावर लग्नाच्या पत्रिका व्हायरल होत आहेत. अशीच एक व्हायरल होणारी लग्नपत्रिका पाहून पोलीसही हादकले. या लग्नपत्रिकेत असं काही होतं की पोलिसांनाही धक्का बसला. या लग्नपत्रिकेमुळे आता नवरदेव अडचणीत आला आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलं असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. असं या लग्नपत्रिकेत आहे तरी काय हे पाहण्याची उत्सुकता आता तुम्हालाही असेल.

तुम्ही तशा बऱ्याच हटके लग्नपत्रिका पाहिल्या असतील. आधार कार्ड, कुणी पॅनकार्डच्या स्वरूपातील पत्रिकांचा यात समावेश आहे. काही लोक सध्याच्या परिस्थितीला अनुसरून अशी लग्नपत्रिका छापतात. सध्या देशात लोकसभा निवडणूक होता. हेच लक्षात घेऊन ही लग्नपत्रिका छापण्यात आली आहे. त्यानंतर ही लग्नपत्रिका वाटली आणि एकच गोंधळ उडाला. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं.

लग्नपत्रिका आहे कुणाची?

व्हायरल झालेली लग्नपत्रिका तेलंगणातील आहे. मेडक जिल्ह्यातील मोहम्मद नगर गेट ठांडा येथील सुरेश नाईक नावाची व्यक्ती ज्याच्या भावाच्या लग्नाची ही पत्रिका आहे. पत्रिका पाहून त्यांनाही धक्का बसला. त्यांनी वर आणि त्याच्या भावाविरोधात गुन्हा दाखल केला आहे, असं वृत्त डेक्कन क्रॉनिकलनं दिलं आहे.

असं या लग्नपत्रिकेत आहे तरी काय?

तुम्ही लग्नपत्रिका पाहाल तर यावर एका व्यक्तीचा फोटो आहे. सामान्यपणे लग्नपत्रिकेवर काही लोक नवरा-नवरीचे फोटो देतात. पण या पत्रिकेवर ही एकटीच व्यक्ती आहे. ही व्यक्ती आहे ती लोकसभा निवडणुकीला उभ्या असलेल्या उमेदवाराची. या लग्नपत्रिकेवर भाजपचे लोकसभा उमेदवार घुनंदन राव यांचा फोटो छापण्यात आला आहे. लग्नाची भेट म्हणून आगामी निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन त्यांनी पाहुण्यांना केलं.

फोटो : एक्स

लग्नपत्रिकेची डिझाईन किंवा त्यात जे छापण्यात आलं त्यामुळे काही वेळा कार्ड व्हायरल होतात. मात्र अशी लग्नपत्रिका अडचणीची करू शकते,असं कोणालाच वाटलं नसेल.

पोलिसाच्या बहिणीची लग्नपत्रिका Viral

याआधी मध्यप्रदेशातील दमोह येथील पोलीस कॉन्स्टेबलची लग्नपत्रिकाही व्हायरल झाली होती. हटा पोलीस ठाण्याचे आरक्षक मनीष सेन यांची बहीण आरतीचं लग्न 23 एप्रिल रोजी होतं. याठिकाणी 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. आपल्या बहिणीच्या लग्नपत्रिकेत मनीष यांनी सर्व लोकांनी मतदान करावं, असं आवाहन लोकांना केलं. आरक्षक मनीष सेन यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा त्यांच्या बहिणीचा विचार आहे. हा विचार लोकांसाठी आज जागरुकतेचे कारण बनला आहे. लोक या संदेशाची स्तुती करत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.