तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेतील सोढी हे पात्र निभावणारे सुप्रसिद्ध अभिनेते गुरुचरण सिंह बेपत्ता झाले आहेत. मागच्या चार दिवसांपासून गुरुचरण सिंह बेपत्ता असून वडिलांनी त्यांच्या शेवटच्या भेटीबद्दल सांगितलं आहे. गुरुचरण सिंह बेपत्ता असल्याची माहिती त्यांच्या वडिलांनी दिल्ली पोलिसांना दिली. वडिलांनी सांगितलं की, गुरुचरण सिंह सोमवारी दिल्ली एअरपोर्टसाठी घरातून निघाले होते. ते मुंबईला जाणार होते. परंतु मुंबईत पोहोचले नाहीत अन् घरीही आले नाहीत.
ईटाइम्सच्या रिपोर्टनुसार, गुरुचरण सिंह यांच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात जावून अभिनेता बेपत्ता झाल्याची खबर दिली. रिपोर्टमध्ये म्हटलं की, माझा मुलगा गुरुचरण सिंह, वय - ५०, २२ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता मुंबईला जाण्यासाठी घरातून बाहेर गेला होता. तो फ्लाईटसाठी एअपोर्टला गेला हगोता. परंतु तो मुंबईला पोहोचलाच नाही आणि घरीही माघारी आला नाही. त्याचा फोनसुद्धा लागत नाही. तो मानसिकरित्या स्थिर असून आम्ही त्याचा शोध घेतला परंतु तो बेपत्ता झाल्याचं दिसून येत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.