Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुण्यात पोलीस अन् गुन्हेगारात गोळीबाराचा थरार; कुख्यात गुंड नव्या वाडकर फिल्मी स्टाईल जेरबंद

पुण्यात पोलीस अन् गुन्हेगारात गोळीबाराचा थरार; कुख्यात गुंड नव्या वाडकर फिल्मी स्टाईल जेरबंद 

पुणे: पुणे जिल्ह्यातील मुठा गावात पोलीस आणि गुन्हेगारात गोळीबाराचा थरार रंगला. गुन्हेगार नव्या उर्फ नवनाथ निलेश वाडकर (वय १८) याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर नव्या वाडकर याने गोळी झाडली. त्यानंतर पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल नव्या वाडकरच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. त्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या वाडकर याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाठलाग करून अटक केली. नवनाथचा आणखी एक साथीदार केतन साळुंखे याला देखील पोलिसांनी अटक केली आहे. आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हा संपूर्ण थरार घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनाथ वाडकर हा सराईत गुन्हेगार आहे. पुणे पोलिसात त्याच्यावर यापूर्वी देखील गुन्हे दाखल आहेत. खुनाचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात तो मागील काही दिवसांपासून फरार होता. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची पथके मागील काही महिन्यांपासून त्याच्या मागावर होते. दरम्यान आज सकाळी तांत्रिक विश्लेषण दरम्यान नव्या वाडकर हा मुळशी तालुक्यातील मुठा परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेचे खंडणी विरोधी पथक त्याला पकडण्यासाठी गेले होते. आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पोलिसांचे पथक मुठा गावात गेले असता पोलिसांना पाहून वाडकर याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनीही त्याचा पाठलाग सुरू केला. पाठलाग सुरू असतानाच वाडकर याने पोलिसांच्या दिशेने एक गोळी झाडली. त्यानंतर पोलिसांनीही स्वसंरक्षणार्थ प्रत्युत्तरादाखल वाडकरच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. त्यानंतरही पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या वाडकर याला फिल्मी स्टाईलने पाठलाग करू अटक करण्यात आली.

नव्या वाडकरचा पूर्व इतिहास

पर्वती परिसरातील जनता वसाहतीत वाडकर आणि सनी चव्हाण उर्फ चॉकलेट सुन्या यांच्या गुन्हेगारी टोळ्या होत्या. कधीकाळी वाडकर हा सनी चव्हाणचा उजवा हात म्हणून ओळखला जायचा. कालांतराने वाडकर आणि चव्हाण यांच्यात वैमनस्य आल्याने वाडकर याने स्वतःची टोळी स्थापन केली. तो स्वतः टोळी प्रमुख म्हणून काम करत होता. त्याच्या टोळीत सिंहगड रोड, धायरी, जनता वसाहत परिसरातील मुले काम करत होती. जवळपास २००७ पासून या दोघांमध्ये वैमानश्य होते.

दरम्यान मध्यंतरीच्या काळात या दोघांमध्ये समझोता करण्याचा प्रयत्नही झाला. मात्र वाडकर याचा त्याला विरोध होता. काही वर्षांपूर्वी पोलिसांवर गोळीबार केल्याच्या प्रकरणात निलेश वाडकर तुरुंगात गेला होता. तुरुंगातून सुटून आल्यानंतर वाडकर हा सनीच्या मागावर होता. मात्र याची कल्पना सुन्याला आल्यानंतर त्याने जनता वसाहत परिसरात कोयत्याने वार करून नवनाथ वाडकरचा खून केला. या गुन्ह्यात फरार असलेल्या चॉकलेट सून्याला पोलिसांनी अटक केली. तेव्हापासून निलेश वाडकर याचा मुलगा असलेल्या नव्या उर्फ नवनाथ वाडकर याने जनता वसाहत परिसरात वर्चस्व निर्माण करण्यास सुरुवात केली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.