Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लस कंपनीनेच मान्य केले. 'कोव्हीशिल्ड ' मुळे रक्ताच्या गुठल्या होतात

लस कंपनीनेच मान्य केले. 'कोव्हीशिल्ड ' मुळे रक्ताच्या गुठल्या होतात 


कोविड-19 चा सामना करण्यासाठी जगभरात जी एस्ट्राजेनेका लस देण्यात आली त्यासंदर्भात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. ही ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेका लस भारतामध्ये कोव्हिशिल्ड  या नावाने ओळखली जात होती.

युकेच्या न्यायालयात ब्रिटिश फार्मास्युटिकल कंपनी एस्ट्राजेनेका (AstraZeneca) ने प्रथमच कबूल केले आहे की त्यांच्या कोविड-19 लसीमुळे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. एस्ट्राजेनेकाने ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने ही लस विकसित केली आहे. ही लस घेतल्यानंतर मृत्यू होणे, रक्ताच्या गाठी तयार होणे आणि इतर गंभीर आजार होत असल्याच्या कायदेशीर कारवाईला एस्ट्राजेनेका सामोरे जात आहे. या लसीमुळे गंभीर दुष्परिणाम झाल्याचा आरोप अनेक कुटुंबांनी केला. या लसीमुळे TTS सिंड्रोमसारखे दुर्मिळ दुष्परिणाम होऊ शकतात. या सिंड्रोममुळे शरीरात रक्त जमते. यामुळे व्यक्तीमध्ये ब्रेन स्ट्रोक आणि कार्डियाक अरेस्टचा धोका वाढतो. याशिवाय हा सिंड्रोम शरीरात प्लेटलेट्स कमी होण्याचे कारण बनू शकतो. युकेमधील शेकडो कुटुंबांनी एस्ट्राजेनेका लसीविरुद्ध कोर्टात तक्रार केली आहे.


युके न्यायालयात ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेकाने केले मान्य

ब्रिटिश दैनिक 'टेलिग्राफ'ने न्यायालयाच्या कागदपत्रांचा हवाला देत एक अहवाल तयार केला आहे. त्यानुसार एस्ट्राजेनेकाविरुद्ध पहिला खटला जेमी स्कॉट नावाच्या व्यक्तीने दाखल केला होता. एप्रिल 2021 मध्ये एस्ट्राजेनेका लस घेतल्यानंतर त्याच्या मेंदूला कायमची दुखापत झाली. लस घेतल्यानंतर तो काम करू शकला नाही. जेमीची स्थिती इतकी वाईट होती की त्यादरम्यान हॉस्पिटलने त्याच्या पत्नीला तीन वेळा फोन करून सांगितले होते की तिचा नवरा मरणार आहे.

जेमीला टीटीएस (थ्रॉम्बोसिस विथ थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम) नावाचा गंभीर दुष्परिणाम झाला. त्यामुळे लोकांच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होतात आणि प्लेटलेट्सची संख्या कमी होते. रिपोर्टनुसार, एस्ट्राजेनेकाने या वर्षी फेब्रुवारीमध्येच कोर्टात कागदपत्रे सादर केली होती. यामध्ये, कोविड लसीमुळे काही लोकांना टीटीएस सारखा आजार होऊ शकतो, असे सांगण्यात आले. कंपनीविरुद्ध यूके उच्च न्यायालयात 51 खटले दाखल आहेत. पीडित कुटुंब कंपनीकडून सुमारे 1000 कोटी रुपये (100 दशलक्ष पौंड) नुकसान भरपाईची मागणी करत आहे.यापूर्वी, मे 2023 मध्ये, एस्ट्राजेनेकाने म्हटले होते की ते TTS ची शक्यता सर्वसाधारणपणे लसीमुळे होत नाही. मात्र, आता काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये असे होऊ शकते, असे कंपनीचे म्हणणे आहे आणि हे का घडले हे त्या कंपनीला माहित नाही. लस नसतानाही टीटीएस होऊ शकतो, असेही कंपनीचे म्हणणे आहे.


यापूर्वीही झाला होता आरोप

जेव्हा एस्ट्राजेनेक ची Covid-19 लस दिली जाऊ लागली तेव्हाही त्याच्या दुष्परिणामांबद्दल बरेच वाद झाले. तथापि, कंपनीने तेव्हा सांगितले होते की चाचणी दरम्यान लसीचे कोणतेही गंभीर दुष्परिणाम दिसले नाहीत. लसीकरणानंतर थकवा, घसा खवखवणे, हलका ताप अशी लक्षणे दिसू लागल्याचे सांगण्यात आले. परंतु मृत्यूचे किंवा गंभीर आजाराचे एकही प्रकरण नोंदवले गेले नाही.

भारतात, ही लस सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) ने तयार केली आहे. लस बाजारात येण्यापूर्वीच SII ने एस्ट्राजेनेक सोबत करार केला होता. सीरम इन्स्टिट्यूट ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. भारतात, सुमारे 80 टक्के लसीचे डोस फक्त कोव्हिशील्डचे आहेत.डिसेंबर 2020 पासून जगातील अनेक देशांत करोना प्रतिबंधक लस द्यायला सुरुवात झाली.

भारतात 16 जानेवारी 2021 पासून लसीकरण मोहीम गटागटानं सुरू झाली. ही मोहीम सुरू होण्यापूर्वी करोनाची जगातील वाढती व्याप्ती लक्षात घेऊन, सर्व देशांनी ज्या-ज्या लशींच्या चाचण्यांचा दुसरा टप्पा पूर्ण झाला होता, त्यांच्या त्या टप्प्याअखेर मिळालेल्या परिणामांचं विश्लेषण केलं आणि त्यांना ‘आपत्कालीन मान्यता’ मानवी चाचण्यांचा तिसरा टप्पा पूर्ण होण्याआधीच देऊन टाकली.

लशींच्या मानवी चाचण्यांच्या तिसरा टप्प्यात साधारणपणे लशीमुळे आजाराविरोधी मिळणारी सुरक्षितता, लशीचा परिणाम किती काळ टिकतो याचा अंदाज आणि लशीमुळे होणारे तत्कालीन, दूरगामी दुष्परिणाम लक्षात येतात. मात्र, मार्च महिन्यापासून ‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी’नं विकसित केलेली आणि ‘अ‍ॅस्ट्रा झेनिका’नं उत्पादित केलेली लस घेतल्यावर जगातील अनेक देशांत, विशेषतः युरोपियन देशांत रक्तात गुठळ्या निर्माण होऊन अनेक व्यक्तींचा मृत्यू झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या. या करिता ‘युरोपियन मेडिसिन्स एजन्सी’ आणि ब्रिटनमधील ‘मेडिसिन अँड हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सी’ यांनी केलेल्या सर्वेक्षणामध्ये, दर 10 लाख व्यक्तींच्या लसीकरणामध्ये चार जणांना रक्तात गुठळ्या झाल्यानं मृत्यू पावल्याचं लक्षात आलं. मार्च-एप्रिल महिन्यापासून जर्मनी, स्वीडन, हॉलंड, स्पेन, डेन्मार्क, फ्रान्स या देशांत या लशीच्या वापरास काही काळासाठी बंदी पुकारण्यात आली.

ऑक्सफर्डची ही लस भारतात ‘कोव्हिशिल्ड’ या नावानं ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ ही पुण्यातील कंपनी बनवते. युरोपातील भीतीचे भारतातही पडसाद उमटले; पण आश्चर्य म्हणजे भारतात या लशीमुळे अशा गुठळ्या होण्याच्या घटना खूप कमी घडल्या. मात्र, ‘कोव्हिशिल्ड’ लस घेतल्यावर जगातील घटनांप्रमाणे भारतात काही घडतेय का, याची चाचपणी करण्यासाठी भारताच्या ‘अ‍ॅडव्हर्स इफेक्ट्स फॉलोइंग इम्युनायझेशन’ या संस्थेनं 3 एप्रिल 2021 पर्यंत झालेल्या, संपूर्ण भारतभरातील 753 पैकी 684 जिल्ह्यातील साडेसात कोटींपेक्षा जास्त व्यक्तींच्या लसीकरणपश्चात आलेल्या दुष्परिणामाचे सर्वेक्षण केले. त्यात त्यांना एकूण 700 जणांना कोणते ना कोणते गंभीर साइड-इफेक्ट्स आल्याचे लक्षात आले. एकूणात हे प्रमाण 10 लाख व्यक्तींमागे 983 एवढं होतं. त्यातील केवळ 26 जणांना रक्तात गुठळ्या होण्याचा दुष्परिणाम झाल्याचं सिद्ध झालं.

त्यामुळे या भारतीय संस्थेनं 17 मे 2021 रोजी जाहीर केलं, की भारतात लसीकरणानंतर रक्तात गुठळ्या होऊन व्यक्ती गंभीर होत आहेत; मात्र त्याचं प्रमाण कमालीचं अत्यल्प आहे. हे प्रमाण दर दहा लाख व्यक्तींमागे 0.61 एवढेच आहे आणि युरोपियन देशांच्या 10 लाखामध्ये 4 व्यक्ती, या तुलनेत कमालीचं अत्यल्प आहे. लस घेतल्यावर वीस लाखांत एकाला रक्तात गुठळ्या होऊ शकतात; पण बाकीच्या 19,99,999 लोकांमध्ये करोना होण्याचा धोका टळतो.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.