नागपुरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. काल मुंबई विमानतळावर अशा प्रकारचा धमकीचा ई-मेल आल्यानंतर नागपुरातही याच प्रकारची ईमेलद्वारे धमकी देण्यात आली आहे. सीआयएसएफ निदेशकाना या प्रकारचा ई मेलवर धमकीचा हा इशारा मिळाल्यानंतर (सीआयएसएफ) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल व स्थानिक पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. विमानतळावर अधिकच कडक तपासणी सुरू झाली आहे. एक उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची कमिटी स्थापन करण्यात आली असून, नागपूर, मुंबईसोबत देशातील गोवा, भोपाळ, कोलकाता अशा इतरही आंतरराष्ट्रीय विमानतळांवर विमानतळ उडविण्याची धमकी एकाच वेळी देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे, सोलापूर येथे प्रचार दौऱ्यावर आहेत. आज (सोमवार) महाराष्ट्रात असताना अशा प्रकारच्या धमकीवजा इशाऱ्यामागे कुणाचा खोडसाळपणा की काही विघातक शक्तींचा हात आहे, या दृष्टीने तपासासाठी पोलिस यंत्रणा कामाला लागली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.