Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नागपूरमध्ये नितीन गडकरींविरोधात काँग्रेस आक्रमक

नागपूरमध्ये नितीन गडकरींविरोधात काँग्रेस आक्रमक


नागपूरमध्ये काँग्रेस भाजप  उमेदवार नितीन गडकरी यांच्याविरोधात चांगलीच आक्रमक झाली आहे. अचार समहिता भंग केल्याची तक्रार अतुल लोंढे  यांनी नितीन गडकरींविरोधात निवडणूक आयोग कडे केली आहे.
नागपूरच्या वैशाली नगर परिसरात विद्यार्थ्यांकडून प्रचार केल्याचा आरोप काँग्रेसकडून नितीन गडकरींवर करण्यात आला आहे. १ एप्रिल रोजी दुपारी तळपत्या उन्हात हातात भाजपचे झेंडे आणि बॅनर घेऊन विद्यार्थी उभे होते. हे सर्व विद्यार्थी  एनएसव्हीएम फुलवारी शाळेतील विद्यार्थी होते. शाळकरी मुलांचा उपयोग भाजप उमेदवार नितीन गडकरी  यांनी प्रचारसभेसाठी केला. कायदा आणि नैतिक मानकांबद्दलची ही स्पष्ट अवहेलना गंभीर आहे. त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही." असं म्हणत त्यांनी नितीन गडकरी यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.


निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीत अतुल लोंढे पुढे म्हणाले की, "निवडणूक आयोगाचे स्पष्ट निर्देशांमध्ये निवडणूक विषयक कामांमध्ये मुलांना सहभागी करून घेण्यास मनाई आहे. असे असूनही भाजप आणि नितीन गडकरी हे त्यांच्या वैयक्तिक प्रचारासाठी शाळकरी मुलांचा वापर करत आहेत."

" १ एप्रिल रोजी वैशाली नगर येथे दुपारी १२ ते १ च्या दरम्यान नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी एनएसव्हीएम फुलवारी शाळेतील शाळकरी मुले वैशाली नगर परिसरात रस्त्यावर उभी होती. कायद्याची ही अवहेलना आहे." असं म्हणत अतुल लोंढे यांनी नितीन गडकरी यांची उमेदवारी रद्द करण्याची कारवाई करावी अशी, मागणी केली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.