प्रसिद्ध तेलगू अभिनेता रघु बाबूच्या कारचा भीषण अपघात, धडकेत बीआरएस नेत्याचा मृत्यू
सिनेजगतातून एक अत्यंत दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध तेलुगू अभिनेता रघु बाबूच्या कारला अपघात झाला आहे. रघू बाबूची कार आणि बाईक यांच्यात भीषण टक्कर झाली आणि या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
17 एप्रिल रोजी घटना घडली –
रघू बाबू यांच्या कारचा हा अपघात 17 एप्रिल रोजी दुपारी घडला होता. या अपघातात भारत राष्ट्र समितीचे (BRS) 50 वर्षीय नेते संधिनेनी जनार्दन राव यांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी आता रघू बाबूंचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर समोर आला आहे. रघू बाबू हैदराबादला जात होते आणि याच दरम्यान नारकेटपल्ली-अडानकी महामार्गावर त्यांची कार दुचाकीला धडकली.
चालक चालवत होता गाडी –
हा अपघात झाला तेव्हा चालक रघु बाबूची कार चालवत होता. आता पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून चालकाला ताब्यात घेतले आहे. अपघात झाला तेव्हा घटनास्थळी उपस्थित असलेले लोक तेथे पोहोचले होते. या घटनेत जखमी झालेल्या जनार्दन राव यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
रघु बाबू देत आहेत स्पष्टीकरण –
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये अभिनेता त्याच्या कारमध्ये बसून या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना दिसत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.