Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आरक्षण मिळण्याच्या अटीवरच विशाल पाटील यांना मराठा स्वराज्य संघाचा पाठिंबा.

आरक्षण मिळण्याच्या अटीवरच विशाल पाटील यांना मराठा स्वराज्य संघाचा पाठिंबा.


सांगली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार विशाल दादा पाटील यांना मराठा स्वराज्य संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय महादेव बापू साळुंखे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या अटीवरच आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत व या पाठिंबाचे पत्र श्रीमती शैलेजा भाभी यांच्याकडे देत आहोत असे सांगितले. या वेळेला महादेव बापू साळुंखे पुढे म्हणाले की देशातील मोदी सरकार हटवण्यासाठी, देशातील महागाई, वाढलेला भ्रष्टाचार,महिला वरती होणारे अत्याचार,वाढलेली बेरोजगारी हे सर्व थांबवण्यासाठी व अनेक वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही त्यासाठी संसदेमध्ये प्रश्न विचारण्यासाठीच आमचा पाठिंबा विशाल पाटील यांना देत आहोत असे सांगितले. 


तसेच मराठा स्वराज्य संघाचा पाठिंबा महाराष्ट्रातील महाविकास आघाडीसाठी असेल व सांगलीमध्ये विशाल दादा पाटील यांच्या पाठीशी आम्ही सर्व जण पूर्ण ताकतीनिशी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते येणाऱ्या काळात रात्रीचा दिवस करून त्यांना निवडून आणण्यासाठी काम करतील असे वक्तव्य केले. यावेळेला श्रीमती शैलेजा भाभी म्हणाल्या आम्ही मराठा स्वराज्य संघाचा पाठिंबा स्वीकारून माननीय महादेव बापू साळुंखे जिल्ह्यातील त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानते व सर्वजण आपण मिळून विशाल दादांना प्रचंड मतांनी निवडून आणूया त्यांचे चिन्ह हे लिफाफा आहे. 

या लिफाफ्या चिन्हाच्या समोर सर्वांनी बटन दाबून विशाल दादांना प्रचंड मताने निवडून आणावे अशी विनंती केली. यावेळी जिल्हाध्यक्ष एड. रणधीर कदम म्हणाले जत सारख्या दुष्काळी भागामध्ये अजूनही पाणी आलेलं नाही विशाल दादाकडेच आमचे सर्वांचं लक्ष आहे व तेच काही तरी करू शकतील असा विश्वास आहे म्हणून आम्ही आज सर्व पदाधिकारी सर्व कामाला लागत आहोत असे सांगितले आहे. यावेळेला राज्य प्रवक्ते माननीय प्रवक्ते संतोष पाटील म्हणाले आपली लढाई भाजप बरोबर आहे भाजपच्या खासदाराला या वेळेला संधी द्यायची नाही त्यांनी संसदेत एकही अजून पर्यंत प्रश्न विचारला नाही. त्यांचा प्रश्न विचारतांचा संसदेमधला एक तरी फोटो व्हायरल करा आणि माझ्याकडून एक लाख रुपये घेऊन जावा असे वक्तव्य केले. भाजपचे हे खासदार सांगलीच्या विचाराचे नाही तर ते बाहेरील कोणाच्या तर विचाराचे आहेत असे गेल्या दहा वर्षांपासून दिसून येत आहेत. 

शिक्षण कमी असल्यामुळे हे खासदार संसदेत कुठलेही प्रश्न विचारू शकत नाहीत त्यांची हिंदी व इंग्लिश या भाषेवर प्रभुत्व नाही ,शिवाय त्यांची तब्येत बरोबर नसते त्यामुळे सुशिक्षित,उच्च शिक्षित कुठलेही गुन्हे नसणारे असा खासदार विशाल दादाच्या रूपात संसदेत पाठवूया अशी माहिती दिली. या वेळेला माजी नगरसेविका सौ सुवर्णा ताई पाटील म्हणाल्या की या जिल्ह्यामध्ये वसंतदादांनी अनेक सहकारी संस्था काढल्या त्यामुळे लोकांच्या हाताला कामे मिळाले तसेच स्वर्गीय पतंगराव कदम साहेब यांनी शिक्षण क्षेत्रात ठिकठिकाणी संस्था स्थापन करून गरीब मुलांना शिकवले त्यांच्या हाताला कामे दिली. 

या वेळेला सेक्रेटरी अनमोल पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले व उपाध्यक्ष सुनील दळवी यांनी सर्वांचे आभार मानले. या वेळेला मराठा स्वराज्य संघाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहून विशाल दादांना प्रचंड मताने निवडून आणायची घोषणा केले. या वेळेला शहराध्यक्ष सुधीर भाऊ चव्हाण सरकार, डॉ.महेश भोसले, सर्जेराव पाटील. मच्छिंद्र बाबर,श्रेया शिंदे,सतीश जाधव,सतीश पाटील,नितीन शिंदे, शरद पवार,एड. सिद्धू महाडिक,पी आर पाटील दादा, गोपाळ पाटील दादा,शशिकांत नागे व इतर पदाधिकारी उपस्थित राहून सर्वांनी विशाल दादांना प्रचंड मतांनी निवडून आणण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे असे ठरले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.