निवडणुका जाहीर झाल्या आहेत. प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. मात्र अद्यापही पालघर लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटलेला नाही. यातच शिंदेंचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांच्यावर भाजपच्या स्थानिक नेत्यांची नाराजी असल्याची चर्चा आहे.
याच संदर्भात आज मनोर या ठिकाणी महायुतीच्या घटक पक्षांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. महायुतीत कुणीही नाराज नाही, आम्ही सारे एकदिलाने काम करुन महायुतीचा उमेदवार निवडन आणू, असे बैठकीत ठरवण्यात आले.
या बैठकीत भाजप, शिवसेनेचा शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट, रिपब्लिकन पक्ष आठवले गट आदी समविचारी पक्ष सहभागी झाले होते. मात्र महायुतीचा एक घटक पक्ष म्हणजे, बहुजन विकास आघाडीचा एकही नेता उपस्थित नव्हता. यामुळे बविआ आता आपला स्वतंत्र उमेदवार पालघरमधून देणार हे स्पष्ट झाले आहे. या बैठकीत ही जागा कुणाला आणि उमेदवार कोण हे ठरवण्यापेक्षा महायुतीचा उमेदवार येथून निवडून पंतप्रधान मोदींचे हात आपल्याला बळकट करायचे, अशा ठरवण्यात आले.
त्यासाठी महायुती ताकदीने काम करण्यास सज्ज आहे. महायुतीच्या उमेदवाराला बहुमताने निवडून आणू असा ठाम निर्धार यावेळी करण्यात आला. महायुतीत उमेदवार कुणीही असला तरी त्या उमेदवाराला प्रचंड मताधिक्याने निवडून आणू, असा एक सूर ही यावेळी आवळण्यात आल्या या बैठकीनंतर कुंदन संखे माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, महायुतीचा नेमका उमेदवार कोण? याबाबत हायकमांड निर्णय घेईलच. वरुन एकदा निर्णय आला तर त्याची आम्ही अंमलबजावणी करु. सर्वजण एकत्र येऊन एकदिलाने काम करु. उमेदवार कोणत्याही पक्षाचा असला तरी आम्ही त्याला निवडून आणूच. नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचे आहे. त्यामुले उमेदवार कोण? पक्ष कोणता? या बाबी गौण आहेत. महायुतीसाठी काम करने हेच आमचे ध्येय आहे.मनोर या ठिकाणी 'सायलेंट रिसॉर्ट' येथे झालेल्या या बैठकीत पालकमंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, खासदार राजेंद्र गावित, कुणबी सेनेचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार आनंद ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, शिवसेनेचे पालघर जिल्हाप्रमूख कुंदन संखे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.