Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पत्नीशी फोनवर बोलत असल्याचा संशय, तरुणावर धारदार हत्याराने वार

पत्नीशी फोनवर बोलत असल्याचा संशय, तरुणावर धारदार हत्याराने वार

पुणे : पत्नीशी फोनवर बोलतो, संशयातून एकावर धारदार हत्याराने वार केल्याचा धक्कादायक प्रकार ताडीवाला रोड येथील गगन उनो इमारतीजवळ घडला. या प्रकरणी एकावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विजय लक्ष्मण निरगुडे (३६, रा.सीएमई गेट, ढोरे चाळ, सिद्धार्थनगर, दापोडी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता. २०) दुपारी सव्वादोन ते अडीचच्या सुमारास फिर्यादी विजय निरगुडे हा ताडीवाला रोड येथील गगन उनो बिल्डिंगजवळ कारमध्ये मोबाइलवर चित्रपट पाहत असताना तेथे एक जण अचानक आला. त्याने विजय हा आपल्या पत्नीबरोबर फोनवर बोलतो, याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी देत, सोबत आणलेल्या धारदार हत्याराने त्याच्या डाव्या गालावर वार केले. या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बंडगार्डन पोलिस करत आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.