Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

" पक्ष फोडणाऱ्यांना योग्य जागा दाखवणार ", शरद पवारांचा इशारा

" पक्ष फोडणाऱ्यांना योग्य जागा दाखवणार ", शरद पवारांचा इशारा 


'मी पुन्हा येईन' म्हटलं होतं. पण, त्यासाठी अडीच वर्षे लागली. अडीच वर्षांनी दोन पक्ष फोडून आणि दोन साथीदारांना सोबत घेऊन आलो, असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी केलं होतं. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार  यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. "पक्ष फोडणाऱ्यांना योग्य जागा दाखवणार," असं म्हणत शरद पवारांनी फडणवीसांना इशारा दिला आहे. ते एका मेळाव्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते.



शरद पवार  म्हणाले, "महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी  एका ठिकाणी सांगितलं की, मी दोन पक्ष फोडून आलो याठिकाणी आलो आहे. मग काय कर्तृत्व आणि काय काम केलं? खऱ्या अर्थानं माणूस जोडण्याचं आणि ऐक्याचं काम करतो. त्याच्याबद्दल आदर सांगत असतो. पण, पक्ष फोडले म्हणणाऱ्यांना हजारोंच्या नाहीतर लाखोंच्या संख्येनं चिवट शिवसैनिक आणि कार्यकर्ते योग्य जागा दाखविल्याशिवाय राहणार  याशिवाय 'याचा अर्थ ह्या सगळ्या गोष्टीला आदित्य ठाकरेचा छुपा पाठिंबा समर्थन आहे का? हा प्रश्न मला या निमित्त विचारायचा आहे, असं आमदार नितेश राणे यांनी म्हटलं आहे. तसेच, प्रॉपर्टीसाठी महिलेल्या छळणाऱ्या फसवणाऱ्या शाखाप्रमुखाला आवर्जून भेटीगाठी कशाला?' असा सवालही नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना केला आहे.

याशिवाय 'आम्ही कल्याणमधून निवडणूक लढू म्हणत मोठे-मोठे वाघ फिरत होते. कुठल्या नेत्यांची नावे घेण्यात आली. पण, मोठ मोठ्या वल्गना करणारे आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई आणि उद्धव ठाकरे कुठे आहेत? या मतदारसंघात झालेला विकास पाहून त्यांची लढण्याची हिंमत झाली नाही.', अशी टीका खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाकरेंवर केली आहे.

'उपमुख्यमंत्री फडणवीस हे शिंदे सेनेचे उमेदवारही जाहीर करतात आणि तेच जाहीर केलेल्या उमेदवाराचे तिकीटही कापतात. मग शिंदेंच्या शिवसेनेचे मुख्य नेते काय करतात. स्वतःला शिवसेना म्हणून घेणाऱ्यांचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असाच प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे.' असं युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई म्हणाले आहेत.

तसेच 'मोठ्या मनापासून सांगत होते सामान्य शिवसैनिकाला पुढे आणणार. पुढे आणायचे होते तर आता वडील मुख्यमंत्री असताना तुम्ही खासदारकी का लढवता?, द्या सामान्य शिवसैनिकांना संधी का तुमच्या तेवढी दानत नाही.' अशा शब्दांमध्ये वरुण सरदेसाई यांनी शिंदे पितापुत्रांवर टीका केली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.