Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाजपा नेत्यांनी निवडणूक प्रचारापासून दूर रहा! नक्षलवंद्याच्या धमकीचे पत्रक

भाजपा नेत्यांनी निवडणूक प्रचारापासून दूर रहा! नक्षलवंद्याच्या धमकीचे पत्रक 


छत्तीसगडमध्ये नक्षलींच्या विरोधात भाजप सरकारने उघड मोहिम उघडली आहे. छत्तीसगडमध्ये रामनवमीच्या दिवशीच तब्बल २९ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. या कारवाईला काँग्रेसने खोटी कारवाई असल्याचे म्हणत भाजपवरच टीका केली होती.

मात्र, आता नक्षलवाद्यांनी भाजप नेत्यांना उघड धमकी देण्यास सुरुवात केली आहे. बस्तर भागात बॅनर आणि भीत्तीपत्रके लावून ही धमकी देण्यात आली आहे. नक्षलवाद्यांनी पोस्टरल लावत म्हटले आहे की, आमच्या बांधवांच्या हत्येसाठी सरळसरळ भाजपच जबाबदार आहे. त्यामुळे सुरू असलेल्या लोकसभा निवडणूकीच्या प्रचारापासून भाजप नेत्यांनी दूर रहावे अन्यथा जीव गमवावा लागेल, अन्यथा तिरुपति कटला आणि कैलास नाग यांच्यासारखी अवस्था करू, जीव घेऊ, अशा शब्दांत धमक्या देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, याच आठवड्यात केंद्रीय सुरक्षा दलांनी कांकेर जिल्ह्यातील एक चकमकीत २९ नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. नक्षलींना हा मोठा दणका मानला जात आहे. त्यानंतर आता विरोधी कारवाई म्हणून नक्षलवाद्यांनी नवीन कट रचण्यास सुरुवात केली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, या कटाचा पहिला भाग म्हणून केवळ भाजपच्याच नेत्यांना लक्ष्य केले जाणार आहे, असे पत्रकात स्पष्ट म्हटले आहे. छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यातील इंद्रावती नदीतील छिंदनार, चेरपाल आणि तुमरीगुंडा मार्गावर मोठ्या संख्येने पोस्टर चिकटवण्यात आले आहेत. पोलीसांनी हे बॅनर्स आणि भित्तीचित्रके हटवली आहेत.

या बॅनरवर भाजप नेत्यांना उघड धमकी देण्यात आली आहे. निवडणूक प्रचारापासून दूरच रहा, असे सांगण्यात आले आहे. निवडणूकांवर आम्ही बहिष्कार टाकत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. छिंदनार-तुमरीगुंडा हा रस्ता झाडे आणि दगड टाकून बंद करण्यात आला आहे. यानंतर स्थानिक परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण आहे. या पत्रकांमध्ये म्हटल्यानुसार, 'भाजप नेत्यांनी या निवडणूकीपासून दूर रहावे, आदिवासींच्या हत्येसाठी भाजपचे नेते जबाबदार आहेत. निवडणूक प्रचारात सहभागी होणाऱ्यांचा आम्ही तिरुपती कटला आणि भाजप नेते कैलाश नाग यांच्यासारखी अवस्था करू.' या दोन्ही नेत्यांची हत्या नक्षलवाद्यानी केली होती. पोलसांनी सुरक्षेच्या कारणास्तव निवडणूक प्रचाराला जाण्यापूर्वी पोलीसांना कळवण्याच्या सूचना उमेदवार आणि भाजप नेत्यांना दिल्या आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.