Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

घराच्या भिंतीला आणि फर्निचरला वाळवी लागली आहे? या घरगुती प्रभावी मार्गानी करा नष्ट

घराच्या भिंतीला आणि फर्निचरला वाळवी लागली आहे? या घरगुती प्रभावी मार्गानी करा नष्ट

वाळवी घराच्या भिंती आणि लाकडी फर्निचर पोकळ बनवते, वेळेत लक्ष दिले नाही तर संपूर्ण घर पोखरू शकते. मुळात वाळवी ही पटकन ओळखता येत नाही, ती पुन्हा पुन्हा लागते. तुमच्या घरात देखील एका कोपऱ्यात वाळवीने आपले बस्तान मांडायला सुरूवात केली असेल तर, या काही घरगुती उपायांचा अवलंब करून तुम्ही तिचा पुरता नाईनाट करू शकता.

वाळवी ही घराला लागणारी अशी कीड आहे, जी संपूर्ण घर पोखरून काढू शकते. घरातील मौल्यवान फर्निचर असो, किंवा लाकडी दरवाजे आणि खिडक्या असो तिच्या मार्गावर येणाऱ्या प्रत्येक गोष्टींचा फडशा पाडल्याशिवाय ती राहत नाही. परिणामी संपूर्ण घर पोकळ बनते. वेळेत लक्ष दिले नाही तर घर कोसळू देखील शकते. त्यामुळे घरात वाळवी आढळल्यास त्यावर ताबडतोब नियंत्रण करणे गरजेचे आहे.

वाळवीपासून मुक्ती मिळवण्यासाठी घरगुती उपाय

वाळवी ही एक अशी समस्या आहे, जी लवकर समजून येत नाही, परंतु जेव्हा हळूहळू ती वस्तू पोकळ बनू लागते, तेव्हा वाळवी लागल्याचे कळते. घराचे दरवाजे, खिडक्या आणि लाकडी फर्निचरला अनेकदा वाळवीचा प्रादुर्भाव होतो. वाळवीचा त्रास खास करून तळमजल्यावर राहणाऱ्या लोकांना जास्त असतो. ओलाव्यामुळे काहीवेळा भिंतींवर देखील वाळवीचा प्रादुर्भाव होतो. जर तुमच्या घरात ही समस्या असेल तर उशीर न करता हे घरगुती उपाय करा.

मिठ

घरात वाळवी येण्याची समस्या असेल तर मिठाचा वापर करा. खूप कमी लोकांना माहित आहे की मीठ वाळवीपासून मुक्त होण्यासाठी प्रभावीपणे कार्य करते. मिठात वाळवीपासून बचाव करणारे गुणधर्म असतात. जिथे वाळवी असेल तिथे मीठ शिंपडा.

कडुलिंबाचे तेल

कडुनिंबाच्या तेलाचा देखील वाळवीपासून सुटका करण्यासाठी प्रभावी घरगुती उपायांमध्ये समावेश आहे. कडुलिंबाच्या तेलाचा वापर केल्याने कीटक, वाळवी दूर होतात. हे एक नैसर्गिक टर्माइट दीमक किलर म्हणून वापरले जाते. जिथे वाळवी असेल तिथे कडुलिंबाचे तेल अशा प्रकारे ठेवावे की वाळवी ते खायला येईल.

बोरिक ऍसिड

सफेद रंगाची बारीक बोरिक ऍसिड पावडर देखील वाळवी नष्ट करण्यास मदत करते. हे कीटक नियंत्रण उपाय म्हणून वापरले जाते. बोरिक ऍसिड झुरळे आणि वाळवी दूर करण्यास मदत करते. याच्या गोळ्या बनवून प्रभावित भागावर लावा. हे वाळवी आणि इतर कीटक काढून टाकेल. हे तुम्हाला थोड्या अंतराने करावे लागेल.

व्हिनेगर

भिंती किंवा फर्निचरमधून वाळवी दूर करण्यासाठी व्हिनेगरचा वापर केला जातो. वाळवीपासून मुक्त होण्यासाठी व्हिनेगर हा एक नैसर्गिक उपाय आहे. थोडं पाणी किंवा लिंबाच्या रसात व्हिनेगर मिसळा आणि वाळवी लागलेल्या भागावर लावा. व्हिनेगर फवारणीनंतर 2 दिवसांनी ही प्रक्रिया पुन्हा करा. या पद्धतीने, वाळवी एकदा काढली की ती परत येत नाहीत.

दुपारचे उन्ह

तुमच्या खुर्च्या किंवा टेबलांपैकी एकाला वाळवी लागली असेल दुपारच्या उन्हात त्या ठेवा. अति उष्णतेमुळे वाळवी जगू शकत नाही आणि या समस्येपासून सुटका होईल.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.