Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अर्ज बाद केल्याने अपक्ष उमेदवाराची सुप्रीम कोर्टात धाव : चंद्रचूड यांनी अक्षरशः पिसं काढली!

अर्ज बाद केल्याने अपक्ष उमेदवाराची सुप्रीम कोर्टात धाव : चंद्रचूड यांनी अक्षरशः पिसं काढली!


सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी लोकसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवाराच्या अर्ज रद्द प्रकरणावर कठोर शब्दांत टीका केली आहे. आता उमेदवारी रद्द झाल्याच्या प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालय दखल घेऊ लागले तर अराजकता निर्माण होईल, असे सरन्यायाधीश म्हणाले. जवाहर कुमार झा यांनी बिहारच्या बांका लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी दाखल केली होती, मात्र त्यांचा अर्ज रिटर्निंग अधिकाऱ्याने रद्द केला होता. यानंतर त्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. 


जवाहर कुमार झा यांनी त्यांच्या याचिकेत दावा केला आहे की, रिटर्निंग अधिकाऱ्याने 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांचे उमेदवारी मनमानी आणि बेकायदेशीरपणे रद्द केले. या प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुनावणी दरम्यान सरन्यायाधीस चंद्रचूड म्हणाले की, "तुम्हाला निवडणूक याचिका दाखल करावी लागेल. पण तुम्ही कलम ३२ अन्वये अशी याचिका दाखल करू शकत नाही."

सरन्यायाधीस चंद्रचूड  म्हणाले, "जर उमेदवारी अर्ज नाकारल्याच्या प्रकरणांचे सुप्रीम कोर्ट दखल घेऊ लागले तर निवडणुकीत अराजकता माजेल. आम्ही नोटीस बजावली आणि अशा प्रकरणांवर सुनावणी होऊ लागल्या तर निवडणूक प्रक्रिया विस्कळीत होईल. तुम्हाला निवडणूक नियम आणि कायद्यांची शिस्त पाळावी लागेल. उमेदवारी अर्ज फेटाळल्याच्या विरोधात याचिका स्वीकारण्यास आम्हाला रस नाही, असे चंद्रचूड यांनी सांगितले 
चुका सुधारण्यासाठी एक दिवस -

वकील आलोक श्रीवास्तव यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या याचिकेत, उमेदवारांचे नामांकन अर्ज फेटाळण्याच्या भारतभरातील निवडणूक रिटर्निंग अधिकाऱ्यांची मनमानी सुरू असून, याला आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला  विनंती केली होती. निवडणूक अर्जात चिन्हांकित केलेल्या प्रत्येक चुका दुरुस्त करण्यासाठी उमेदवाराला किमान एक दिवस अधिकची संधी देण्याचे निर्देश संपूर्ण भारतातील निवडणूक अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.