संपदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या आर्थिक घोटाळा प्रकरणी काँग्रेस नेते ज्ञानदेव वाफारे व त्याची पत्नी सुजाता वाफरे यांच्यासह पाच संचालकांना जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. नाईकवाडी यांनी बुधवारी जन्मठेप सुनावली.
अहमदनगर : संपदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या आर्थिक घोटाळा प्रकरणी काँग्रेस नेते ज्ञानदेव वाफारे व त्याची पत्नी सुजाता वाफरे यांच्यासह पाच संचालकांना जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. नाईकवाडी यांनी बुधवारी जन्मठेप सुनावली. तसेच इतर बारा जणांना वेगवेगळ्या कलमाखाली पाच ते दहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
संपदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी १७ आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने या प्रकरणी या सर्व आरोपींना दोषी धरले होते. यावर दोन्ही बाजूने युक्तीवाद झाला. न्यायालयाने आज अंतिम निर्णय दिला. संस्थेचे अध्यक्ष ज्ञानदेव वाफारे, त्याची पत्नी सुजाता वाफरे, साहेबराव भालेकर, संजय बोरा, रवींद्र शिंदे अशा पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सरकारी पक्षातर्फे ऍड वसंत ढगे यांनी बाजू मांडली. ठेवीदारांच्या वतीने अनिता दिघे यांनी, तर अवसायिकाच्या वतीने ऍड. सुरेश लगड यांनी बाजू मांडली. या निकालाची राजकीय क्षेत्रात उत्सुकता होती. ज्ञानदेव वाफारे राजकीय क्षेत्रातील मोठे प्रस्थ असून काँग्रेस नेते आहेत. जिल्ह्यातील एका माजी मंत्र्यांचे ते कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.