Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धैर्यशील मानेचां पत्ता होणार कट? शिवसेनेकडून निवेदिता मानेंची तयारी सुरु

धैर्यशील मानेचां पत्ता होणार कट? शिवसेनेकडून निवेदिता मानेंची तयारी सुरु 


हातकणंगले : लोकसभा निवडणूक 2024च्या पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी होणार आहे. महाराष्ट्रात पाच मतदारसंघाचा यामध्ये समावेश असून निकाल 4 जून रोजी लागणार आहे. मात्र अद्याप महायुतीचे असो अथवा महाविकास आघाडीचे जागावाटपाचे चित्र अस्पष्ट आहे.

अशात महायुतीत आणखी तिढा वाढण्याची शक्यता अधिक आहे. कारण हातकणंगले मतदारसंघातून विद्यमान खासदार धैर्यशील माने यांची उमेदवारी रद्द करत नव्या उमेदवार म्हणजेच त्यांच्या आई माजी खासदार निवेदिता माने यांची निवडणूक लढवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. शिवाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहा खासदारांचा पत्ता कट होण्याची चर्चा असून हिंगोलीमध्ये हेमंत पाटील आणि हातकणंगल्यामधून धैर्यशील माने यांच्या नावाला भाजपकडून विरोधही होत आहे. 

लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. यामध्ये हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील आणि हातकणंगल्याचे खासदार धैर्यशील माने यांच्या नावाचा समावेश होता. मात्र, या दोन्ही नावांना भाजपचा कडाडून विरोध आहे. त्यामुळे आता या दोन्ही ठिकाणचे उमेदवार मागे घेण्यात येणार असून त्या ठिकाणी नवीन चेहरे देण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

कोण आहेत निवेदिता माने?

निवेदिता माने या धैर्यशील माने यांच्या आई असून त्यांनी या आधी दोन वेळा हातकणंगले मतदारसंघाचं नेतृत्व केलं आहे. या आधी अस्तित्वात असलेल्या इचलकरंजी लोकसभा मतदारसंघातून निवेदिता माने या 1999 आणि 2004 साली राष्ट्रवादीच्या तिकिटावर खासदार होत्या. त्यानंतर 2009 साली राजू शेट्टी यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर 2014 सालीही राजू शेट्टी यांनी पुन्हा एकदा बाजी मारली. मात्र, मागील लोकसभेच्या निवडणुकीवेळी धैर्यशील माने यांनी राजू शेट्टींचा पराभव केला होता.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.