Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राजस्थान, बंगाल आणि महाराष्ट्रात एनडीएला झटका बसण्याची चिन्हे

राजस्थान, बंगाल आणि महाराष्ट्रात एनडीएला झटका बसण्याची चिन्हे

लोकसभा निवडणूक 2024 मध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी आहे. याआधी जाहीर झालेल्या अनेक सर्वेक्षणांमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीला अनेक ठिकाणी झटका बसण्याची चिन्हे आहेत. राजस्थानमध्ये भाजपला अनेक जागा गमवाव्या लागू शकतात. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातही एनडीए आघाडीला कमी जागा मिळण्याची शक्यता आहे. लोकपोल सर्वेक्षणानुसार, पश्चिम बंगालमध्ये टीएमसीला 26-28, काँग्रेसला 2-4 आणि भाजपला 11-13 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

राजस्थानमधील लोकपोल सर्वेक्षणात एनडीए आघाडीला 17-19 जागा मिळाल्या आणि इंडिया आघाडीला 6 ते 8 जागा मिळतील, असे सांगितले जात आहे. 2019 मध्ये भाजपने येथील सर्व 25 जागा जिंकल्या होत्या. या सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्रात 23-26 जागा इंडिया आघाडीला मिळतील, असा अंदाज आहे.

महाराष्ट्राची स्थिती

ABP CVoter सर्वेक्षण मध्ये इंडिया आघाडीला महाराष्ट्रात 20 जागा देण्यात आल्या असून युतीला 42 टक्के मते मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी एनडीए आघाडीला 43 टक्के मतांसह 28 जागा मिळण्याचा अंदाज आहे. न्यूज 18 च्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात इंडिया आघाडीला 41 तर एनडीएला 7 जागा मिळू शकतात.

टाईम्स नाऊ ईटीजीनुसार, महाराष्ट्रात महायुतील 34-38 आणि इंडिया आघाडीला 9-13 जागा मिळू शकतात. इंडिया टीव्ही CNX च्या सर्वेक्षणात NDA ला 53 टक्के मतांसह 35 जागा आणि इंडिया 35 टक्के मतांसह 13 जागा देण्यात आल्या आहेत. इंडिया टुडे मूड ऑफ द नेशनच्या सर्वेक्षणात NDA ला 40.5 टक्के मतांसह 22 जागा आणि इंडिया आघाडीला 44.5 टक्के मतांसह 26 जागा मिळतील.

महाराष्ट्रात 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युतीचा भाग होते. त्यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन गटात विभागले गेले नव्हते. भाजप आणि शिवसेनेच्या एनडीए युतीला 41 जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी 23 जागा भाजपच्या वाट्याला तर 18 जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्या. राष्ट्रवादीला 4 तर काँग्रेसला एक जागा मिळाली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.