पंजाबमध्ये चॉकलेट खाल्ल्यानंतर दीड वर्षाच्या मुलीला रक्ताच्या उलट्या झाल्याने एकच खळबळ माजली. या मुलीवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच अधिकारी ज्या दुकानातून चॉकलेट खरेदी केले, तिथे पोहोचले. याप्रकरणी अधिक तपास केला असता चॉकलेट एक्सपायरी डेटचे असल्याचे आढळून आले. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.
रविया असे रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या मुलीचे नाव असून ती लुधियाना येथील रहिवाशी आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहिती माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी रविया त्यांच्या कुटुंबांसोबत पाटियाला येथे गेली होती, जिथे तिने एका दुकानातून चॉकलेट खरेदी केली. घरी परतल्याने तिने चॉकलेट खाल्ले. मात्र, काही वेळाने तिला उलटीचा त्रास होऊ लागला.त्यावेळी नातेवाईकांना सुरुवातीला घरच्यांना वाटले की ही एक सामान्य गोष्ट आहे. परंतु, मुलीची प्रकृती सतत खराब होत गेली. २२ वर्षांच्या मुलीनेही चॉकलेट खाल्ल्याने तिचीही प्रकृती बिघडली. यानंतर घरच्यांना संशय आल्याने त्यांनी मुलीला तातडीने डॉक्टरांकडे नेले. मात्र, मुलीची प्रकृती गंभीर झाल्याने डॉक्टरांनी संबंधित मुलीला सीएमसी रुग्णालयात दाखल केले, जिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत.
याबाबत माहिती मिळाल्यानंतर नातेवाईक पुन्हा त्याच चॉकलेटच्या दुकानात गेला. तिथे एक्स्पायरी डेटचा माल आढळून आला. हा प्रकार कळताच त्याने आरोग्य विभागाकडे तक्रार करण्यात आली. यानंतर ते आरोग्य अधिकाऱ्यांच्या पथकासह त्या मिठाईच्या दुकानात गेले. त्यानंतर त्यांनी एक्सपायरी डेटचा सर्व माल जप्त केला. यानंतर पोलिसांनाही तेथे पाचारण करण्यात आले. पोलिसांनी कुटुंबीयांचे जबाब नोंदवले, त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मुदत संपलेल्या मालाच्या विक्रीची तपासणी आरोग्य विभागाने सुरू केली आहे.
केके खाऊन ११ वर्षाच्या मुलीची हत्या
पंजाबच्या काही पटियालामध्ये काही दिवसांपूर्वी केक खाऊन एका अकरा वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला होता. मृत मुलीने वाढदिवसानिमित्त तिच्या आई वडिलांनी ऑनलाईन केक ऑर्डर केला. मात्र, हा केक खाल्ल्यानंतर मुलीची तब्येत बिघडली आणि उपचारदरम्यान त्यांच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.