मोठी बातमी! काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का; नेत्यानं दिला तडाकाफडकी राजीनामा
नागपूर: लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. प्रचाराला वेग आला आहे. मात्र दुसरीकडे काँग्रेसला धक्क्यावर धक्के बसत असल्याचं पाहायला मिळत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. नागपुरातून मोठी बातमी समोर येत आहे. रामटेक विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे नेते गज्जू यादव यांनी राजीनामा दिला आहे. गज्जू यादव हे 2019 मध्ये रामटेकमधून काँग्रेसचे विधानसभेचे उमेदवार होते.
लोकसभा निवडणुकीसाठीचं मतदान अवघ्या काही दिवसांवर आलं असताना गज्जू यादव यांनी राजीनामा दिला आहे. हा पक्षासाठी रामटेकमध्ये मोठा धक्का मानला जात आहे. ते 2019 मध्ये रामटेकमधून काँग्रेसचे विधानसभेचे उमेदवार होते. दरम्यान काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर गज्जू यादव हे आता भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान यापूर्वी देखील अनेक नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला तर दुसरीकडे मिलींद देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता गज्जू यादव यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे, ते पुढे काय भूमिका घेणार हे अद्याप अस्पष्ट आहे. मात्र ते भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
काही दिवसांपूर्वीच चंद्रपूरमध्ये देखील काँग्रेसला मोठ धक्का बसला होता. चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि तेली समाजाचे नेते प्रकाश देवतळे यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. विदर्भात तेली समाज मोठ्याप्रमाणात आहे, मात्र असं असतानाही काँग्रेसकडून एकाही तेली समाजाच्या नेत्याला उमेदवारी न देण्यात आल्यानं देवतळे नाराज होते अशी माहिती समोर आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.