आजकाल अनेक मुलं लग्न ठरत नसल्याच्या तक्रारी करत आहेत, अशा अनेक मुलांना आपण पाहिलं आहे.तिशी उलटून गेली तरी आता तरुण मुलांची लग्न ठरत नाहीत. लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील आनंदाचा सोहळा असतो.
कुणी प्रेम विवाह करतं तर कुणी घरच्यांच्या पसंतीने आपला जोडीदार निवडतो. मात्र अशाप्रकारे ठरवून लग्न करण्याचा प्रकरणात बऱ्याचदा जवळच्या नातेवाईकांमध्ये लग्नासाठी स्थळं शोधली जातात. मग अशावेळी नातेवाईकांना मुलाबद्दल मुलीबद्दल माहिती असते मात्र बऱ्याचदा अरेंज मॅरेजमध्ये घरचे मुलाची चौकशी करत असतात. यावेळी ग्रामस्थ, शेजारी यांच्याकडून माहिती मिळत असते. दरम्यान एका तरुणासाठी असचं एक स्थळ येणार असंत. यावेळी तरुणान ग्रामास्थांना आगळं वेगळं आव्हान केलं आहे. लग्न होईपर्यंत कुणीही कुठेही माझ्याबद्दल सांगायचं नाही असं त्यानं खडसावलं आहे. हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
हा तरुण गावकऱ्यांना आपल्या विरोधात भडकवल्यास त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत अशी धमकी देत आहे. हा तरुण स्पिकरवर बोलताना, माझ्यासाठी उद्या स्थळ येणार आहे, यावेळी जर मुलीला आणि मुलीच्या घरच्यांना कळलं की मी दारु पितो तर हे स्थळ माघारी जाईल. त्यामुळे कुणीही माझ्याबद्दल चुकीचं सांगणार नाही. त्यामुळे तुम्हा लोकांना विनंती आहे की उद्या घरीच थांबा. 'लग्न मोडले तर , ते कोणासाठीही चांगले होणार नाही.' हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर हँडल (@ChapraZila) सह शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत २७ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर अनेक यूजर्सनी यावर आपली प्रतिक्रियाही दिली आहे.हा व्हिडिओ पाहून यूजर्स आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'बरोबर आहे, लग्न होऊ द्या.' दुसऱ्या यूजरने लिहिले की, दारु सोडा आधी.' त्याचवेळी एका यूजरने लिहिले की, आता लग्न होणार नाही हे निश्चित झाले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.