कोण म्हणतं गोड खाल्ल्याने डायबिटीस वाढतं? डॉ. विकास दिव्यकिर्ती सांगतात 'हा' भाजलेला पदार्थ खा
डा यबिटीस एक सायलेंट किलर आजार आहे. ज्यामुळे हळूहळू सर्व अवयव खराब होतात. ज्यामुळे शुगर लेव्हल वाढते. मूत्र, नसा, किडनी या ठिकाणी वाढलेली शुगर दिसून येते. हा एक गंभीर आजार नसून डायबिटीस वाढल्यानंतर ती नियंत्रणात आणणं खूपच कठीण होतं. जास्त गोड खाण्यामुळे डायबिटीस वाढतो असा अनेकांचा समज असतो. डॉ. विकास दिव्यकिर्ती यांनी डायबिटीस वाढण्याचं खरं कारण काहीतरी दुसरंच सांगितले आहे.
दिल्लीतील हंसराज कॉलेजच्या एका कार्यक्रमात त्यांनी मुलांना सांगितले की, मुलं असं म्हणतात शुगर खाल्ल्याने डायबिटीस वाढते यात अजिबात तथ्य नाही. डायबिटीस स्ट्रेसमुळे होतो. (Ref) डायबिटीस झाल्यानंतर साखर खाण्यास मनाई केली जाते. पण साखर खाल्ल्याने डायबिटीस होते असं नाही. ताण- तणावामुळे डायबिटीसचा धोका वाढतो.
स्ट्रेसमुळे डायबिटीस वाढतो
अत्याधिक ताण-तणाव घेतल्यामुळे अनेक आजार उद्भवतात. डायबिटीस युके च्या रिपोर्टनुसार टाईप २ डायबिटस आणि स्ट्रेस यांत घनिष्ट संबंध आहे. स्ट्रेस जास्त घेतल्यामुळे पॅन्क्रियाज इंसुलिन हॉर्मोन तयार करणारे सेल्स रोखू शकत नाहीत. ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते. अनेक संस्थांच्या म्हणण्यानुसार ताण-तणाव हा एकच घटक मधुमेह विकसित करतो असं नाही.
ताण-तणावामुळे कोर्टिसोल आणि एड्रेनालीईन हॉर्मोन वाढते. जे शरीरासाठी नुकासानकारक ठरू शकते. ज्यामुळ इंसुलिन परिणामकारक ठरत नाही. ज्याला इंसुलिन रेजिस्टेंट असं म्हटलं जातं. यात सेल्स ग्लुकोजचा वापर करू शकत नाहीत आणि रक्तातील साखरेचं प्रमाण वाढू लागते.
डायबिटीसचा आहारात ताण निर्माण करू शकतो. या आजारात रुग्ण आपल्या खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही आणि पूर्ण लाईफस्टाईल बदलावी लागते. सुरूवातीला हे सर्व करण आव्हानात्मक ठरू शकतं आणि स्ट्रेसफूल ठरतं.
ताण-तणावापासून शरीराचा बचाव करण्यासाठी तुम्ही रताळ्यांचे सेवन करू शकता. यात हेल्दी कार्ब्स असतात. याचे सेवन केल्याने कोर्टिसोल लेव्हल कमी होते. याशिवाय डायबिटीक फ्रेंडली फूड असते ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल रेग्युलेट होण्यास मदत होते. उकळून किंवा रोस्ट करून खाऊ शकता.
ताण-तणाव कमी करण्याचे उपाय चांगला आहार घेण्याचा प्रयत्न करा, आपल्या मानसिक आरोग्याकडे पूर्णपणे लक्ष द्या, आपल्या मनातील गोष्टी विश्वसनीय लोकांची शेअर करा, आपल्या जे काम करायला आवडेल ते करा, व्यायाम करणं कंटिन्यू सुरू ठेवा.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.