Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शेतकरी आणि मराठा बांधवाच्या आक्रमकतेपुढे चंद्रकांत पाटील यांनी भाषण गुंडाळल

शेतकरी आणि मराठा बांधवाच्या आक्रमकतेपुढे चंद्रकांत पाटील यांनी भाषण गुंडाळल 


माढ्यातील टेभुर्णी येथे भाजपा उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ महायुतीतील घटक पक्षाच्या बैठकीत चंद्रकात पाटील यांच्या समोर संतप्त शेतकऱ्यांनी शतावरी पिकाचे पैसे मिळत नाहीत याबाबत प्रश्न विचारला.


माढा : माढ्यातील टेभुर्णी येथे भाजपा उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ महायुतीतील घटक पक्षाच्या बैठकीत चंद्रकात पाटील यांच्या समोर संतप्त शेतकऱ्यांनी शतावरी पिकाचे पैसे मिळत नाहीत याबाबत प्रश्न विचारला. अचानक प्रश्न विचारताच एकच गोंधळ उडाला यामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना आपले भाषण अर्ध्यावर सोडून बैठक गुंडाळावी लागली. ही घटना माढा मतदारसंघातील टेंभुर्णी येथील रामकृष्ण मंगल कार्यालय येथे आज (दि.10) घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, माढा लोकसभा मतदारसंघ घटक पक्ष निवडणूक नियोजनासाठी पदाधिकारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठक अंतिम टप्प्यात आले असताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना प्रश्न विचारताना सुरली ता.माढा येथील शेतकरी संपतराव अनंता काळे यांनी मागील काही वर्षांपूर्वी माजी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी करमाळा तालुक्यातील कंदर येथे आयुष्य मंत्रालयाचे वतीने कार्यक्रम आयोजित करून शतावरी पिकाची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले होते. अनेक शेतकऱ्यांना ते पिक अनेक शेतक-यांनी जोपासून ती पिके सदर कंपनीला विकली होती. परंतु त्याचे पैसे कोणत्याही शेतक-याला मिळाले नाहीत. यामध्ये सदर शेतकऱ्यांचे 22 लाख अडकले आहेत. याविषयी खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांना चार ते पाच वेळा समक्ष भेटून व्यथा मांडून त्याच्याकडून कुठलेही आश्वासन अथवा पैसे मिळावे यासाठी काहीच प्रयत्न केले नसल्याने सदर शेतकऱ्याने आक्रमकपणे सांगितले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनाच याचवेळी एकाने मराठा आरक्षणासंदर्भात प्रश्न विचारले असता तुम्ही कोणत्या पक्षाकडून आहात असे विचारले व भाजपाला प्रत्येक बुथमध्ये 500 मतापैकी 370 मते मिळतील व तुमच्यासारखी 130 मते आम्ही सोडून देतो असे म्हणताच एकच गोंधळ उडाल्याने शेतकरी काळे यांना पोलिसांनी व कार्यकर्त्यांनी बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला. परंतु अनेकांनी शेतकऱ्यांना बोलू द्या त्याचे मत मांडू द्या, अशी भूमिका घेतली. तोपर्यंत बैठक गुंडाळावी लागली. या बैठकीसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, वन शिंदे, संजय शिंदे, पाटील चेतनसिंग केदार,दीपक साळुंखे पाटील, प्रशांत परिचारक,राजकुमार पाटील,शितोळे,संजय पाटील-भिमानगरकर,बंडुनाना ढवळे-पाटील,सुहास पाटील,शिवाजीराव पाटील-चांदजकर,वैभव मोरे,दिपक पाटील,उमेश पाटील,रामभाऊ शिंदे,अ ॲड धनश्रीताई खटके,सविता जगताप,माया माने,अनिता लोंढे,योगेश बोबडे,जयसिंग ढवळे आदी उपस्थित होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.