'जनतेचा विश्वासच माझ्यासाठी जॅकपॉट' - उदयनराजे भोसले
कुडाळ: जनतेचा विश्वासच माझ्यासाठी जॅकपॉट आहे, त्यामुळे मी कोणत्याही परिणामाचा विचार करत नाही. माझ्या समोरचे उमेदवार भ्रष्टाचारी आहेत म्हणजे आहेतच. त्यामुळे माझा विजय हा निश्चित आहे, असे वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.
रायगाव, ता. जावळी येथील सदिच्छा भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य शिवाजी गायकवाड, रायगावच्या सरपंच हसीना मुजावर, बाळासाहेब गोसावी, नामदेव क्षीरसागर, उपसरपंच समाधान गायकवाड, नाझीम मुजावर ,उमाकांत जाधव, संदीप गायकवाड, वसंत क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती.
उदयनराजे भोसले म्हणाले, जर तुमच्यावर झालेले आरोप खोटे होते तर जामीन मिळवण्यासाठी कोर्टात का गेला. कागद कधी खोटं बोलत नाहीत, ते खरेच असतात. त्यामुळे रडीचा डाव विरोधक खेळत आहेत अस तुम्ही म्हणताय, पण हा रडीचा डाव तुम्हीच खेळत आहात हे लक्षात ठेवा. गांधी मैदानावर येऊन लोकांना हातात माईक द्यावा व त्यांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावी म्हणजे सगळं खरं खोटं समजेल.
शिवाजी गायकवाड म्हणाले, विजय हा आपलाच असून काळजी करण्याचे कारण नाही. प्रजेच्या या दिलदार राजाला या विभागातून आम्ही जास्तीत जास्त मताधिक्य देऊन निवडून आणू. यावेळी बाळासाहेब गोसावी यांनी मनोगत व्यक्त केले. सरपंच हसीना मुजावर यांनी उदयनराजे यांचा सत्कार केला. यावेळी खासदार उदयनराजे भोसले प्रेमी, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.