बॉलिवूडच्या एव्हर ग्रीन अभिनेत्री रेखा आज मोठ्या पडद्यावर सक्रिय नसल्या तरी, त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याच्या चर्चा चाहत्यांमध्ये तुफान रंगलेल्या असतात. आता देखील रेखा त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आल्या आहेत.
अनेक वर्षांपूर्वी रेखा आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान लग्न करणार असल्याचा दावा पाकिस्तानच्या एका वृत्तपत्रात करण्यात आला होता. सांगायचं झालं तर, रेखा यांचं नाव अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. त्यामध्ये पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांचं देखील नाव चर्चेत होतं.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि क्रिकेटर इमरान खान आणि रेखा यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी देखील सर्वत्र जोर धरला होता. इमरान खान आणि रेखा एकमेकांच्या प्रेमात आहेत आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय… अशा चर्चा बॉलिवूड आणि चाहत्यांमध्ये देखील रंगू लागल्या होत्या… एवढंच नाही तर, रेखा यांच्या आईने दोघांच्या लग्नासाठी मुस्लिम एस्ट्रॉलजीसोबत देखील संपर्क साधला होता.
रिपोर्टमध्ये लिहिण्यात आलं होतं की, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान पूर्ण एप्रिल महिना मुंबईत राहणार आहेत. याच दरम्यान, इमरान खान आणि रेखा यांनी प्रेम शिवहार गोदार्क यांच्या घरी, समुद्र किनारी आणि नाईट क्लबमध्ये देखील दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं. दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील इंटरनेटवर व्हायरल झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, रेखा यांच्या आईने देखील लेकीचं इमरान खान यांच्यासोबत असलेल्या नात्यावर वक्तव्य केलं होतं. फक्त इमरान खान रेखा यांच्यासाठी परफेक्ट पार्टनर असू शकतात… असं रेखा यांच्या आई म्हणाल्या होत्या. तेव्हा रेखा आणि इमरान खान यांच्या नात्याची चर्चांनी सर्वत्र जोर धरला होता.रेखा यांच्या नावाची चर्चा अनेक सेलिब्रिटींसोबत रंगली होती. पण बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत होत असलेल्या रिलेशनशिपच्या आजही चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. 'सिलसिला' सिनेमानंतर रेखा - अमिताभ यांच्या नात्याची तुफान चर्चा रंगली. दोघांच्या नात्याबद्दल आजही तुफान चर्चा रंगलेल्या असतात.
अमिताभ बच्चन, विनोद मेहरा, अक्षय कुमार, मुकेश अग्रवाल यांच्यासोबतच आणखी तीन सेलिब्रिटींसोबत रेखा यांच्या अफेअरची तुफान चर्चा रंगली. विश्वजीत, साजिद खान आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत देखील रेखा यांच्या नात्याची तुफान चर्चा रंगली. पण आज वायाच्या 69 व्या वर्षी देखील रेखा एकट्याच आयुष्य जगत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.