Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कामशेत जवळ इनोव्हाचा भीषण अपघात! विवाह सोहळ्याला निघालेल्या दोघीवर काळाचा घाला

कामशेत जवळ इनोव्हाचा भीषण अपघात! विवाह सोहळ्याला निघालेल्या दोघीवर काळाचा घाला 

कामशेत जवळ जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर नायगाव (ता. मावळ) येथे एका भरधाव इनोव्हा कारचा भीषण अपघात (दि. 26 एप्रिल) झाला. या अपघातात दोघींचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी (दि. 26) सकाळी साडेनऊ च्या सुमारास हा अपघात घडला. 

सीताबाई तुकाराम लालगुडे (वय 58, रा. कुसगाव खुर्द, ता. मावळ) आणि सिद्धी संतोष तिकोने (वय 18, रा. पाटण, ता. मावळ) अशी मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर रिद्धी संतोष तिकोने (वय 14, रा. पाटण, ता. मावळ) आणि प्रियंका संग्राम भानुसघरे, सुभद्रा किसन भानुसगरे, लता किसन पिंजन असे चारजण जखमी झाले आहेत. 

या प्रकरणी ऋषीनाथ तुकाराम लालगुडे (वय 43, रा. कुसगाव खुर्द, ता. मावळ) यांनी कामशेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, इनोव्हा वाहन चालक सुमित गुलाब पिंजन (वय 23, रा. कीनई, ता. मावळ) या चालकावर कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी सुमित गुलाब पिंजन याने त्याच्या ताब्यातील इनोव्हा कार नायगाव गावच्या हद्दीतून जुन्या मुंबई-पुणे हायवेवरून पुणेहून मुंबईच्या दिशेने जात असताना भरधाव वेगात, अविचाराने, रहदारीचे नियमांकडे दुर्लक्ष करून चालवली. त्यामुळे इनोव्हा कार पलटी होऊन झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू आणि अन्य जण जखमी झाले, म्हणून त्याच्या विरोधात दाखल फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याच आला आहे. या अपघाताचा पुढील तपास पोसई शुभम चव्हाण करत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.