Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

काँग्रेसची १० जणांची नवी यादी जाहीर ; दिल्लीत कन्हैया कुमार विरुद्ध मनोज तिवारी यांच्यात सामना

काँग्रेसची १० जणांची नवी यादी जाहीर ; दिल्लीत कन्हैया कुमार विरुद्ध मनोज तिवारी यांच्यात सामना

काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी त्यांची १० जणांची नवी यादी रविवारी जाहीर केली. यामध्ये दिल्लीतील तीन उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी, कन्हैया कुमार आणि जेपी अग्रवाल यांचा समावेश आहे. ईशान्य दिल्लीतून कन्हैया कुमार विरुद्ध भाजपाचे खासदार, अभिनेते मनोज तिवारी यांच्यात सामना होणार आहे.

कन्हैया कुमार विरुद्ध मनोज तिवारी 

काँग्रेसने दिल्लीतील तीन उमेदवार जाहीर केलेत. कन्हैया कुमारसह जेपी अग्रवाल यांना चांदणी चौक लोकसभा मतदारसंघातून तर उदीत राज यांना उत्तर पश्चिम विधानसभेतून उमेदवारी देण्यात आली आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांना जालंधर लोकसभा मतदारसंघातून तर जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमारला ईशान्य दिल्लीतून संधी देण्यात आली आहे.

दिल्लीत काँग्रेसची आपसोबत आघाडी 

काँग्रेस पक्षाने आम आदमी पक्षाबरोबर आघाडी केलीय. त्यामुळे दिल्लीतील सात जागांपैकी तीन जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत. तर पूर्व दिल्ली, नवी दिल्ली, पश्चिम दिल्ली आणि दक्षिण दिल्ली या चार मतदारसंघात 'आप' पक्ष निवडणूक लढवत आहे.

दिल्लीतील तीन जागांशिवाय पंजाबमधील सहा जागांचीही घोषणा करण्यात आली आहे. पंजाबमध्ये अमृतसरमधून गुरजीत सिंग उजला, फतेहगड साहीबमधून अमर सिंग, भटिंडामधून मोहिंदर सिंग सिद्धू, संगरूरमधून सुखपाल सिंग खैरा आणि पटियाला मतदारसंघातून डॉ. धर्मवीर गांधी यांना तिकीट दिले. याशिवाय उत्तरप्रदेशच्या अलाहाबाद मतदारसंघातून उज्ज्वल रेवती रमण सिंह यांना उमेदवारी दिली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.