Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पंतप्रधान नरेंद्र मोदींना शरद पवारांनी पकडले कोंडीत, ”सिंचन घोटाळ्याची चौकशी करा

पंतप्रधान नरेंद्र मोदींना शरद पवारांनी पकडले कोंडीत, ”सिंचन घोटाळ्याची चौकशी करा

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसने सिंचनात सत्तर हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवारांचे नाव न घेता केला होता. त्यानंतर काही दिवसातच अजित पवार भाजपासोबत गेले होते. यावरून भाजपावर टीका होत आहे. काल नागपूरमध्ये  बोलताना मोदींनी पुन्हा भ्रष्टाचाराचा मुद्दा मांडला. मात्र, आता यावरून शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोंडीत पकडले आहे. ते अहमदनगरमध्ये  पत्रकारांशी बोलत होते.

शरद पवार म्हणाले, सिंचन घोटाळ्यावरुन मोदींनी पुन्हा आरोप केलेत का? मोदींनी यापूर्वी सुद्धा भोपाळच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर सिंचन घोटाळा, राज्य सहकारी बँक घोटाळ्यावरुन आरोप केले होते, त्याचे पुढे काय झाले. त्यांनी त्यावेळी कुणाचे नाव घेतले. ज्यांचे नाव घोटाळ्यात घेण्यात आले, ते आज मोदींसोबत फिरत आहेत.

शरद पवार म्हणाले, सिंचन घोटाळ्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेमका कुणावर केला, हे त्यांनी स्पष्ट करावे. सिंचन घोटाळ्याची चौकशी करावी, आमची काहीच हरकत नाही. पण ज्यांच्यावर त्यांनी आरोप केले, ते त्यांच्यासोबतच हिंडत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी असे सापडले पवारांच्या कैचीत…

सुमारे दहा महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळमध्ये बूथ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. एनसीपीवर ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप मोदींनी केला होता. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा, सिंचन घोटाळा, अवैध खोदकाम घोटाळा अशी ही यादी न थांबणारी आहे असे मोदी म्हणाले होते. मात्र, या आरोपानंतर काही दिवसांतच राष्ट्रवादीत मोठी फुट पडली. त्यानंतर अजित पवार भाजपासोबत गेले. ते महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. त्यांच्यासोबत गेलेल्या काही नेत्यांच्या देखील चौकशा सुरू आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.