Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

चंद्रहार पाटील यांना दणका :, सांगलीमधून मोठी बातमी समोर

चंद्रहार पाटील यांना दणका :, सांगलीमधून मोठी बातमी समोर 


आज लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान पार पडत आहे. याचदरम्यान मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे महाविकास आघाडीचे सांगली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार चंद्रहार पाटील आणि त्यांच्या समर्थकांविरोधात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनापरवाना प्रचार पदयात्रा काढल्यानं चंद्रहार पाटील व त्यांच्या समर्थकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंद्रहार पाटील यांनी मिरज तालुक्यात विनापरवाना प्रचारफेरी काढल्याचा आरोप आहे, या प्रकरणात चंद्रहार पाटील आणि त्यांच्या दोन ते तीन कार्यकर्त्यांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 24 एप्रिल रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 2.30 या वेळेत खटाव, बेडग गावात मतदारांच्या गाठीभेटी घेऊन लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ही पदयात्रा काढण्यात आली होती.

सांगलीमध्ये तिरंगी लढत 

सांगलीमध्ये यावेळी तिरंगी लढत होणार आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील, भाजप उमेदवार आणि काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील अशी ही लढत असणार आहे. विशाल पाटील हे महाविकास आघाडीकडून सांगलीमध्ये काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक होते. मात्र तिथे शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे विशाल पाटील हे नाराज होते. त्यानंतर त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशाल पाटील यांच्या बंडखोरीमुळे सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. त्यातच आता अचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाल्यानं चंद्रहार पाटील यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.