Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर

शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर 


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली आहे. यामध्ये बीड लोकसभा मतदारसंघासाठी बजरंग सोनवणे आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी सुरेश ऊर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आधी पाच नावांची घोषणा करण्यात आली होती. आता आणखी दोन उमेदवारांची घोषणा करण्यात आली. आतापर्यंत एकूण सात उमेदवारांची घोषणा झाली आहे. 

 

पहिली यादी पाच उमेदवारांची -

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने लोकसभा निवडणुकीसाठी शनिवारी पहिली यादी जाहीर झाली. यामध्ये वर्धा - अमर काळे, दिंडोरी - भास्कर भगरे, बारामती - सुप्रिया सुळे, शिरूर - डॉ. अमोल कोल्हे, अहमदनगर - नीलेश लंके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती.

शरद पवार  गटाने ट्विटरवर (X) वर सोनवणे आणि बाळ्यामामा यांना उमेदवारी आज जाहीर केली. या वेळी ट्विटमध्ये शरद पवार गटाने म्हटले की, "विजयाचा निर्धार पक्का करून 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार' पक्षाच्या केंद्रीय संसदीय मंडळाने लोकसभा निवडणूक २०२४ ची दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. चला, आदरणीय खा. शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या साथीने 'तुतारी'ला ललकारी देऊया आणि दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडवूया. "

मुंडे - पाटील यांच्याशी लढत

बीड लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांच्याशी सोनवने लढत देणार आहेत, तर भिवंडीमधून भाजप नेते कपिल पाटील यांच्याशी बाळ्यामामा यांची लढत होणार आहे. दोन्ही ठिकाणीची लढत ही अत्यंत लक्षवेधी आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.