Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आधी बायकोच्या साड्या जाळून टाका, मग भारतावर बहिष्काराचं बोला :, शेख हसीना मुस्लिम नेत्यावर नाराज

आधी बायकोच्या साड्या जाळून टाका, मग भारतावर बहिष्काराचं बोला :, शेख हसीना मुस्लिम नेत्यावर नाराज 


बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्याच देशातील विरोधी खासदारांना फटकारले आहे, त्या नेत्यांनी भारतीय उत्पादनांवर बहिष्कार घालण्याबाबत काही दिवसांपासून एक मोहिम सुरू केली होती. शेख यांनी'आपल्या पत्नीच्या साड्या जाळल्या पाहिजेत, असे म्हटले आहे. भारतीय उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची मागणी करणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांनाही त्यांनी सवाल केला की, आधी त्यांनी सांगावे की त्यांच्या पत्नींकडे किती भारतीय साड्या आहेत आणि त्या का जाळत नाहीत? यावरुन आता बांगलादेशात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.


शेख हसीना यांनी त्यांच्या पक्ष अवामी लीगच्या सभेला संबोधित करताना, विरोधी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या नेत्यांना लक्ष्य केले, या नेत्यांनी भारतीय उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. शेख हसीना म्हणाल्या की, "माझा प्रश्न आहे की, त्यांच्या पत्नींकडे किती भारतीय साड्या आहेत? आणि ते त्यांच्या पत्नींकडून साड्या का घेत नाहीत आणि त्यांना आग का लावत नाहीत? कृपया बीएनपीच्या नेत्यांनी हे सांगा.", असा सवालही त्यांनी केला होता. 

या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या निवडणुकांद्वारे बांगलादेशमध्ये सलग चौथ्यांदा सत्तेवर आलेल्या शेख हसीना म्हणाल्या की, BNP सत्तेत असताना त्यांचे मंत्री आणि त्यांच्या पत्नी भारताच्या भेटींमध्ये साड्या विकत आणि बांगलादेशात विकत असत. त्यांनी भारतीय मसाल्यांवरही चर्चा केली आणि विरोधी नेत्यांच्या घरातील स्वयंपाकघरात भारतीय लसूण, कांदा, आले, गरम मसाला आणि इतर मसाले वापरले जात नाहीत का, असा सवालही त्यांनी केला.

नेमकं प्रकरण काय?

बीएनपी नेते रुहुल कबीर रिझवी यांनी भारतीय उत्पादनांवर प्रतिकात्मक निषेध आणि बहिष्कार म्हणून आपली काश्मीर शाल रस्त्यावर फेकल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी टीका केली. बीएनपी नेते रुहुल कबीर रिझवी यांनी भारतीय उत्पादनांवर प्रतिकात्मक निषेध आणि बहिष्कार म्हणून आपली काश्मीर शाल रस्त्यावर फेकल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी टीका केली.

बांगलादेशमध्ये 'इंडिया-आउट' मोहीम चालवली जात आहे, जी काही कार्यकर्त्यांनी आणि मोठ्या नेत्यांनी सुरू केली आहे, विरोधी पक्ष बीएनपीचे नेते त्याला पाठिंबा देत आहेत. शेख हसीना यांच्या अवामी लीगच्या सलग चौथ्या विजयानंतर प्रचाराला अलीकडच्या काळात वेग आला आहे. या मोहिमेत सहभागी लोकांचा असा दावा आहे की, भारताला शेख हसीना यांना बांगलादेशमध्ये सत्तेवर ठेवायचे आहे कारण त्या भारताच्या व्यावसायिक हिताची सेवा करत आहेत, असा आरोपही विरोधकांनी केला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.