मुंबई : अल्कोहोलबद्दल चर्चा करायचं म्हटलं तर, आपल्या मनात व्हिस्की, रम किंवा वोडका असे शब्द येतात. काहींना देशी दारूचीही आठवण येत असेल. मद्याच्या या प्रकारांच्या चवीमध्ये फार फरक असतो.
विशेषतः परदेशी मद्याच्या तुलनेत देशी दारूची चव जास्तच वेगळी असते. देशी दारूची आवड असणारे बहुतांश मद्यप्रेमी लहान शहरं किंवा खेड्यापाड्यांमध्ये आढळतात. देशी दारूची दुकानंही वेगळी असतात. सामान्य संभाषणात या दुकांनांना ठेका किंवा दारूचा अड्डा म्हणतात. या उलट परदेशी दारूची दुकाने सहसा श्रीमंत किंवा मध्यमवर्गीय जनता राहत असलेल्या भागात असतात. देशी दारूची दुकानं अशा भागांत असतात जिथे लोकसंख्येचं आर्थिक उत्पन्न कमी असते. ही दारू स्थानिक पातळीवर तयार केली जाते. ज्या ठिकाणी ही दारू तयार केली त्याच्या आजूबाजूच्या गावांमध्ये तिची विक्री होते. भारतात देशी दारू पिणाऱ्यांची संख्या आजही जास्त आहे.
मळी किंवा इतर कृषी उत्पादनांपासून निर्मिती देशी आणि परदेशी दारूच्या चवीमध्ये फरक असला तरी त्यांच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये कोणताही विशेष फरक नाही. दोन्ही प्रकारची दारू बनवण्याची पद्धत जवळपास सारखीच आहे. अनेक दशकांपासून चालत आलेल्या पारंपरिक प्रक्रियेतून देशी दारू तयार केली जाते. मळी किंवा इतर कृषी उत्पादनांपासून तिची निर्मिती होती. फर्मेंटेशन आणि डिस्टिलेशन क्रियांचा वापर दारू निर्मितीमध्ये केला जातो. देशी दारू पॉलिथिनच्या पिशव्या दारूानामतामध्य कला जाता. दशा दारू पाालाथनच्या पिशव्या किंवा प्लॅस्टिकच्या बाटल्यांमध्ये उपलब्ध असते. देशी दारूला देशाच्या वेगवेगळ्या भागांत वेगवेगळी नावं आहेत.
प्युरिफाईड स्पिरिट म्हणजे देशी दारू
देशी दारू हे एक प्रकारचं प्युरिफाईड स्पिरिट किंवा डिस्टिल्ड द्रव असतो. परदेशी दारूच्या उत्पादक कंपन्या देखील स्थानिक दारू उत्पादक कंपन्यांकडून हे स्पिरिट खरेदी करतात. नंतर त्यात वेगवेगळे फ्लेवर टाकून परदेशी किंवा इंग्रजी दारू बनवली जाते. देशी दारूमध्ये कोणताही फ्लेवर वापरला जात नाही. ज्या कच्च्या मालापासून ती बनवली जाते तीच चव या दारूला असते. त्यामुळेच देशी दारूचा वास उग्र असतो.
विक्रीमध्ये दरवर्षी वाढ
भारतात विकल्या जाणाऱ्या एकूण दारूमध्ये दोन तृतीयांश प्रमाण हे देशी दारूचं आहे. एका माहितीनुसार, भारतात सुमारे 242 दशलक्ष देशी दारूच्या बाटल्यांची विक्री होते. हे प्रमाण देशातील मद्य उद्योगाच्या 30 टक्क्यांहून अधिक आहे. तसेच त्यात दरवर्षी सात टक्के वाढ होत आहे. देशी दारूमध्ये अल्कोहोलचं प्रमाण 42.5 टक्के इतकं असतं. या दारूचं प्रमाणापेक्षा जास्त सेवन आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. कारण, ही दारू फक्त एकदा डिस्टिल्ड (शुद्ध) केली जाते.
देशी दारूची विविध नावे
हिरो, जॉय, कॅप्टन आणि दिल से हे भारतातील देशी दारूचे सर्वात मोठे ब्रँड आहेत. पश्चिम बंगाल आणि झारखंडसारख्या पूर्वेकडील राज्यांमध्ये टॉल बॉयची सर्वाधिक विक्री होते. काही ठिकाणी या दारूला हीर रांझा, घूमर, जीएम संत्री आणि जीएम लिंबू पंच असंही म्हणतात.भारतातील सर्वोच्च देशी मद्य निर्मिती करणाऱ्यांपैकी एक असलेल्या ग्लोबल स्पिरिट्सनं दिलेल्या माहितीनुसार, देशी दारूच्या सुमारे डझनभर ब्रँड्सकडे एकूण बाजारपेठेचा 30 टक्क्यांपेक्षा जास्त भाग आहेत. उर्वरित भाग, आयएफबी अॅग्रो लिमिटेड, हरियाणा डिस्टिलरीज लिमिटेड, असोसिएटेड अल्कोहल अँड ब्रुअरीज लिमिटेड आणि पिकाडिली अॅग्रो इंडस्ट्रीज यांच्याकडे आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.