Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आमच्या उठवामुळेच भाजप सतेत,मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी शिंदे सेनेची हायहोल्टेज बैठक

आमच्या उठवामुळेच भाजप सतेत,मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी शिंदे सेनेची हायहोल्टेज बैठक 


महायुतीत  सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र आहे. कारण भाजपच्या  दबावामुळे शिंदेसेनेच्या अनेक खासदारांचे तिकीट  कापले गेल्याने पक्षातील नेत्यांमध्ये अस्वस्थता पाहायला मिळत आहे. दरम्यान याचेच पडसाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या वर्षा निवासस्थानी शनिवारी झालेल्या बैठकीत उमटताना पाहायला मिळाले आणि ही बैठक चक्क हाय व्होल्टेज बैठक ठरल्याची माहिती मिळत आहे. आमच्या उठावामुळेच भाजप सत्तेत आले असून, त्यामुळे त्यांच्या दबावाला बळी पडू नका अशी भूमिका शिंदेसेनेच्या नेत्यांनी या बैठकीत घेतली.



महायुतीत जागावाटपात भाजपकडून सतत शिंदेसेनेची अडचण केली जात असल्याची चर्चा आहे. अशात महायुतीत फक्त शिवसेनेकडूनच युतीधर्म पाळला जात असून, आपल्या पक्षाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा सुर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत उमटताना पाहायला मिळाला. आपण उठाव केल्यानेच भाजपला सत्तेची फळे चाखता येत आहे, त्यामुळे आपल्या पक्षाचे महत्त्व आहे. पण, आपल्याच खासदारांचे तिकीट कापले जात असून, आता भाजपच्या दबावाला बळी पडू नयेत अशी थेट भूमिका शिंदेसेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे शनिवारी रात्री 'वर्षा' निवासस्थानी झालेली बैठक हायहोल्टेज ठरली आहे.

बैठकीतील महत्वाचे मुद्दे...

महायुतीत रायगड, शिरूर मतदारसंघ मित्रपक्षाला देण्यात आले.
परभणी, उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ देऊन शिवसेनेने युतीधर्म पाळला.
पण, मित्रपक्षाकडून युतीधर्म पाळला जातोय का?
आपल्या खासदारांचे तिकीट कापले जात असून, आता दबावाला बळी पडू नका.
कोणत्याही परिस्थितीत नाशिक, ठाणे, पालघर, औरंगाबाद, रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ सोडू नका.
अन्य पक्षाचे लोक आपल्या नैसर्गिक मतदारसंघांवर दावा करत आहेत.
आतापर्यंत आपण चार मतदारसंघ सोडले असून, हे योग्य नसल्याचा संताप व्यक्त करण्यात आला.
बैठकीत नेत्यांची खदखद...

भावना गवळी, हेमंत पाटील यांची उमेदवारी भाजपच्या दबावाखाली कापण्यात आल्याची चर्चा आहे. अशात शिवसेनेकडून रायगड, शिरूर मतदारसंघ मित्रपक्षाला देण्यात आले. सोबतच परभणी, उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघावरील दावा देखील शिवसेनेकडून सोडण्यात आला. आता नाशिक, ठाणे, पालघर, औरंगाबाद, रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर देखील मित्रपक्ष दावा करत असल्याने शिंदेसेनेच्या नेत्यांमध्ये नाराजी आहे. शनिवारी झालेल्या वर्षावरील बैठकीत नेत्यांची खदखद स्पष्ट पाहायला मिळाली. अशात मुख्यमंत्री शिंदे यांनी नेत्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.