Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आंघोळीच्या पाण्यात मीठ टाकण्याचे फायदे वाचून व्हाल अवाक्, जे तुम्हाला माहितही नसतील.....!

आंघोळीच्या पाण्यात मीठ टाकण्याचे फायदे वाचून व्हाल अवाक्, जे तुम्हाला माहितही नसतील.....!

मिठाचे जेवणाची टेस्ट वाढवण्यासोबत आरोग्यालाही अनेक फायदे होतात. जे अनेकांना माहीत नसतात. यात आढळणाऱ्या मॅग्नेशिअम, सोडियम आणि कॅल्शिअमसारख्या मिनरल्सने शरीराला होणाऱ्या इन्फेक्शनपासून बचाव केला जाऊ शकतो. मिठाच्या पाण्यात असलेल्या तत्वांमुळे फंगल इन्फेक्शन वाढणं बंद होतं. तसेच रोज आंघोळीच्या पाण्यात मीठ टाकल्यास याने केसांमध्ये डॅड्रफही होणार नाही. केस आणखी मजबूत आणि चमकदार होतात.

चला जाणून घेऊ आणखी काही फायदे...

केसांसाठी फायदेशीर...

मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्यास रक्तप्रवाह योग्यप्रकारे होतो. केसांमधील किटाणून नष्ट होण्यासोबतच याने डॅंड्रफही दूर होतात. केसांना नवी चमक मिळते. 

त्वचेसाठी फायदा...

मिठाचं पाणी त्वचेच्या निर्जीव पेशींना दूर करण्यास मदत करतं. रोज या पाण्याने आंघोळ केल्यास त्वचा मुलायम आणि चमकदार दिसेल. तसेच याने रंग उजळण्यासही मदत होईल. 

संक्रमणापासून बचाव...

मिठाच्या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, सोडियमसारखे मिनरल्स असतात. हे त्वचेच्या छिद्रांमध्ये जाऊन स्वच्छता करतात. याने स्किन इन्फेक्शन होण्याचाही धोका कमी होतो. 

चांगली झोप...

मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याल थकवा आणि तणाव दूर होता. याने डोक्याला शांतता मिळते आणि रात्री चांगली झोपही लागते. 

हाडांना आणि मांसपेशींना आराम...

मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने हाडांमध्ये होणाऱ्या वेदनांपासून बचाव होतो. तसेच याने ऑस्टियोऑर्थरायटिस आणि टेंडीनीटिससारख्या समस्याही दूर होतात. 

डॉ. सुनील इनामदार



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.