पंतप्रधान मोदी यांची येत्या रविवारी कोल्हापुरात सभा
कोल्हापूर : हातकणंगले आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा रविवारी (दि. २८) कोल्हापुरातील तपोवन मैदानात होणार आहे. सभेची वेळ निश्चित झालेली नाही, परंतु बहुधा ही सभा दुपारीच होण्याची शक्यता आहे.
सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह केंद्र व राज्य सरकारमधील मंत्री उपस्थित राहणार आहेत. महायुतीकडून सभेची तयारी सुरू झाल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली. यापूर्वी मोदी यांची याच मैदानावर २०१४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत प्रचार सभा झाली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.