Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी घेऊन जाणारी रुग्ण वाहिका अचानक पेटली!

गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी घेऊन जाणारी रुग्ण वाहिका अचानक पेटली!


यवतमाळ जिल्ह्यातून सर्वांच्या भुवया उंचवणारी माहिती समोर आली. आर्णी येथील गर्भवर्ती महिलेला प्रसूतीसाठी रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेने अचानक पेटल घेतल्याने परिसरात खळबळ माजली. पंरतु, रुग्णवाहिकेच्या चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. रुग्णवाहिकेने पेट घेतल्याचे समजात चालकाने गर्भवती महिलेसह दोन जणांना बाहेर काढले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, अग्निशमनदलाचे जवान घटनास्थळी दाखल होऊपर्यंत रुग्णवाहिका अक्षरक्ष: जळून खाक झाल्याचे समजते.


मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त रुग्णवाहिका आज सकाळी आर्णी येथील गर्भवर्ती महिलेला प्रसूतीसाठी रुग्णालयात घेऊन जात होती. मात्र, गुरुद्वारा परिसरात सकाळी ११ वाजताच्या सुमारास रुग्णवाहिकेने अचानक पेट घेतला. रुग्णवाहिकेने पेट घेतल्याचे लक्षात येताच चालकाने गर्भवती महिला आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर दोघांना बाहेर काढले. रुग्णवाहिकेच्या चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतूक होत आहे.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमनदलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत रुग्णवाहिका अर्ध्याहून जळून खाक झाली होती. रुग्णवाहिकेत ऑक्सिजन सिलिंडर होते. यामुळे संभाव्य स्फोटाची भिती व्यक्त केली जात होती. मात्र, अग्निशमन दलाने वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळविल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.