बैतूल : मध्य प्रदेशातील बैतूल मतदारसंघातील बहुजन समाजवादी पार्टीचे उमेदवार अशोक भलावी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यामुळे बैतूल लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. भलावी यांनी त्यांनी २०१९ मध्येही बसपाच्या तिकिटावर लोकसभा लढविली होती.
या मतदारसंघातील २६ एप्रिल रोजी होणारे मतदान त्यामुळे पुढे ढकलण्यात आले, असे जिल्हाधिकारी नरेंद्र सिंह रघुवंशी यांनी सांगितले. कायद्यातील तरतुदीनुसार निवडणूक प्रक्रिया थांबविण्यात आली असून, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असेही ते म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.