Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ईअरफोन लावून स्कूटर चालवणे जीवावर बेतले, मोबाईलच्या स्फोटाने घेतला महिलेचा बळी

ईअरफोन लावून स्कूटर चालवणे जीवावर बेतले, मोबाईलच्या स्फोटाने घेतला महिलेचा बळी 


उत्तर प्रदेशातील कानपूरमधून  एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी ईअरफोन लावून स्कूटर चालवणे एका महिलेच्या जीवावर बेतले आहे. या ठिकाणी स्कूटरवरून जात असताना खिशातील मोबाईलचा अचानक स्फोट  झाल्याचा प्रकार घडला असून यामुळे महिलेचा मृत्यू झाला आहे.


मोबाईलचा स्फोट झाल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि स्कूटर रस्त्यावरील दुभाजकावर आदडली. महिलेने हेल्मेट न घातल्यामुळे तिच्या डोक्याला गंभीर दुखापत घाल्याने तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी अपघाताची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

या घटनेत मयत झालेल्या 28 वर्षीय महिलेचे नाव पूजा असून ती फारुखाबाद जिल्ह्यातील नेहरारिया गावातील रहिवासी आहे. ही महिला बुधवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास दुचाकीवरून कानपूरच्या दिशेने जात होती. दरम्यान, तिने कानात ईअरफोन घातले होते. ईअरफोन घालून ही महिला धरधाव वेगात जात असताना हा अपघात झाला. ही महिला कानपूर रेल्वे स्थानकावरून मुंबईला जाण्यासाठी ट्रेन पकडण्यासाठी निघाली होती. मात्र, रस्त्यातच तिच्यावर काळाने घाला घातला. 

हेल्मेट न घातल्याने डोक्याला गंभीर दुखापत

कानपूर-अलिगड महामार्गावर चौबेपूर पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मानपूर गावाजवळील पेट्रोल पंपासमोर ही घटना घडली. स्कूटर चालावत असताना या महिलेने हेल्मेट घातले नव्हते आणि तिच्या कानात इअरफोन होते. दरम्यान, मोबाईचा स्फोट झाल्याने महिलेचे स्कूटरवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला. हेल्मेट नसल्यामुळे महिलेच्या डोक्याला गंभीर मार लागत उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

आधार कार्डवरुन पटली ओळख

हा अपघात होताच लोकांनी धाव घेत पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल होत त्यांनी घटनेचा पंचनामा केला. दरम्यान, पोलिसांना महिलेचे आधार कार्ड सापडले. या आधारकार्डवरून तिची ओळख पटली. यानंतर पोलिसांनी स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधला व त्यांच्याद्वारे महिलेच्या कुटुंबीयांना अपघाताची माहिती देण्यात आली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.