देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात काँग्रेसचा शंभर टक्के वाटा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक हुतात्मे झाले त्यामध्ये काँग्रेसचेच सर्वजण होते. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी इंग्रजांना या देशातून चलेजावची हाक देऊन पळवून लावले त्या वेळेला आपला देश स्वतंत्र झाला. देश स्वतंत्र झाल्यापासून हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेवर लोकशाहीच्या मार्गाने देश चालत आहे.परंतु 2014 च्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर देशामध्ये हुकूमशाहीचे सरकार आले आहे याला गेले दहा वर्षापासून जनता कंटाळली आहे. म्हणून सर्व राज्यात व देशात काँग्रेस पक्षाला अनुकूल परिस्थिती आहे.
त्यामुळे काँग्रेस पक्ष हा सर्वात जुना व मोठा पक्ष आहे लोकशाहीच्या पद्धतीने देशाचा कारभार करणारे व संविधानाच्या आधारावर देशाची वाटचाल करणारा काँग्रेस पक्ष हाच देशाला वाचवू शकतो हे परत एकदा सर्व जनतेच्या मनात भावना निर्माण झाली आहे म्हणून राज्यामध्ये व देशांमध्ये काँग्रेस पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवल्यास 48 पैकी 35 जागा राज्यात मिळतील व देशात 300 पेक्षा जास्त लोकसभेच्या जागा निवडून येतील याची खात्री सर्वसामान्य काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला झाली आहे,म्हणून काँग्रेस पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवल्यास देशात काँग्रेस पक्षाची सत्ता येईल असे सर्वसामान्य काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटू लागले आहे कारणआपले मित्र पक्ष हे आपल्यापेक्षा वरचढ ठरू लागले आहेत काँग्रेस पक्षाला मदत करण्यापेक्षा काँग्रेस पक्षालाच ब्लॅकमेल करू लागले आहेत असे एकंदरीत दिसू लागले आहे व याचा उपयोग ते स्वतःला करू लागले आहेत व यामुळे काँग्रेसला याचा तोटा होणारा आहे म्हणून देशातील आणि राज्यातील काँग्रेसच्या हाय कमांडने स्वतःच्या बळावर जर निवडणूक लढवल्या तर याचा फायदा काँग्रेस पक्षाला होईल व देशांमध्ये लोकसभेच्या कमीत कमी 300 च्या वरती जागा काँग्रेसला मिळतील अशी सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्याला खात्री आहे अशी माहिती मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.