Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

' मला तुम्ही फार आवडता ', सुनेचं चक्क सासूवर जडलं प्रेम, शारीरिक संबध ठेवण्यासाठी खाजगी व्हिडिओ शूट केला अन.....

' मला तुम्ही फार आवडता ', सुनेचं चक्क सासूवर जडलं प्रेम, शारीरिक संबध ठेवण्यासाठी खाजगी व्हिडिओ शूट केला अन.....


सासू -सूनांमधील क्लेष, वाद पोलीस स्टेशनमध्ये जाणं यामध्ये तसं काही नवं नाही. घरोघऱी मातीच्या चुली या म्हणीप्रमाणे प्रत्येक घरात थोडेफार खटके उडत असतात. पण यातील काही प्रकरणं घराचे उंबरे ओलांडून पोलीस स्टेशन गाठतात.

उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्येही एका सासूने आपल्या सुनेविरोधात तक्रार केली आहे. पण तिची तक्रार ऐकल्यानंतर पोलीस कर्मचारीही हादरले आहेत. याचं कारण सासूने पतीला सोडून आपल्यासोबत राहावं अशी या सूनेची इच्छा आहे. याचं कारण सूनेचं सासूवर चक्क प्रेम जडलं आहे. सूनेला आपल्या शारिरीक संबंध ठेवायचे आहेत असा महिलेचा आरोप आहे. अखेर सासूने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सासू आपल्या सूनेची तक्रार करण्यासाठी एसएसपी ऑफिसात पोहोचली होती. पीडित महिला आधी बुलंदशहरच्या कुरावली गावात राहत होती. पण आता दिल्लीच्या करावल नगरमध्ये वास्तव्यास आहे. महिलेला एक मुलगा आणि मुलगी आहे. मुलाचं 2 वर्षांपूर्वी बुलंदशहरच्या खानपूर क्षेत्रातील एका गावात लग्न झालं. लग्नानंतर सासरी पोहोचलेल्या सूनेने सासूसह अजब गोष्टी करण्यास सुरुवात केली. 

सासूचं म्हणणं आहे की, सूनेला तिच्यासह पती-पत्नीचं नातं ठेवायचं आहे. नकार दिला असता तिने जीवे मारण्याची धमकी दिली. अंमली पदार्थ देऊन अश्लील व्हिडीओ शूट करण्याची आणि तो सार्वजनिक करण्याची धमकीही ती देत आहे. यासह आत्महत्या करेन असंही म्हणत आहे. 

सासूने केलेल्या दाव्यानुसार, सूनेचं म्हणणं आहे की मी पती आणि मुलापासून वेगळं होऊन तिच्यासोबत राहावं. मी तुमची चांगली काळजी घेईन. माझ्याशी शारिरीक संबंध ठेवा. तिची समजूत काढण्याचा किंवा नकार दिला तर ती मोबाईलवर अश्लील व्हिडीओ दाखवत दबाव बनवते. संपूर्ण जगात हे सुरु असून, तुम्ही माझ्यासह हे नातं ठेवा असं ती म्हणते. 

मी पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच मला तुम्ही आवडला होतात. त्यामुळेच मी तुमच्या मुलाशी लग्न केलं. मला तुमच्यासोबत राहायचं आहे असं सूनेनं सांगितल्याचं सासूने सांगितलं आहे. दरम्यान तिला वेगळं होण्यास सांगितलं असता 20 लाखांची मागणी करत असल्याचा आरोप केला आहे. 

सासूच्या म्हणण्यानुसार, लग्नाला 2 वर्षं होऊनही अद्याप त्यांना कोणतंही मूल नाही. तिला घेऊन डॉक्टरांकडे गेलो होतो. तपास केल्यानंतर डॉक्टरांनी तिचा गर्भाशय छोटा असल्याचं सांगितलं. त्यामुळे मूल होणं कठीण आहे. यादरम्यान सासूने केलेल्या या आरोपांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलीस सध्या याप्रकरणी तपास करत असून तथ्य पडताळत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.