Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पोलीस कर्मचाऱ्याने डोक्यात गोळी झाडून केली आत्महत्या

पोलीस कर्मचाऱ्याने डोक्यात गोळी झाडून केली आत्महत्या 


पुणेः नागपूरमध्ये पोलिस कर्मचाऱ्याने जीवन संपवल्याची घटना घडली आहे. पुण्यामध्येही शुक्रवारी अशीच घटना घडली होती. नागपूरमधील यूओटीसी कॅम्प परिसरामधील पोलिस कर्मचारी मंगेश मस्के, एसआरपीएफ यांनी शनिवारी ड्युटीवर असताना डोक्यात गोळी झाडून जीवन संपवलं. पुणे आणि नागपूरमध्ये दोन दिवसात दोन घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. 


पुण्यातील घटना

शुक्रवारी पुण्यामध्ये खडक पोलिस ठाण्यांतर्गत लोहियानगर चौकीत पोलिस कर्मचाऱ्याने कार्बाइनमधून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. हा प्रकार शुक्रवारी (ता. ५) सकाळी उघडकीस आला.

भारत दत्ता आस्मर (वय ३४) असे आत्महत्या केलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. आस्मर हे लोहियानगर पोलिस चौकीत रात्रपाळी कर्तव्यावर होते. पोलिस चौकीतील विश्रांती कक्षात शुक्रवारी पहाटे अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास आस्मर यांनी कार्बाइनमधून स्वतःवर चार गोळ्या झाडून आत्महत्या केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.