सांगली लोकसभा मतदारसंघात विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. परंतु काँग्रेसकडूनही ते इच्छुक आहेत. काँग्रेसचा एबी फॉर्म मिळवण्यासाठी प्रयत्न करीत असलेल्या विशाल पाटील यांना अर्ज भरण्याच्या शेवटच्या तासापर्यंतही यश मिळाले नाही. त्यामुळे आता त्यांना या निवडणुकीत अपक्ष म्हणूनच लढावे लागणार असल्याची शक्यता आहे. विशाल पाटील यांच्या निकटवर्तींकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी काँग्रेस पक्षाच्या नावात साम्य असलेल्या भारतीय विकास काँग्रेस आणि अन्य पक्षांच्या पर्यायांचा विचार केला होता. परंतु आता त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, विशाल पाटील यांनी माघार घ्यावी यासाठी महाविकास आघाडी आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. परंतु अद्याप या नेत्यांना यश आलेले नाही.
विशाल पाटील यांना एबी फॉर्म मिळाला नाही तर चंद्रहार पाटील हेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असतील. आज खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांच्यासह महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत त्यांचा अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी चंद्रहार पाटील यांनी मोठे शक्तीप्रदर्शनही केले.
सांगली मतदारसंघात ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. परंतु ही उमेदवारी जाहीर करताना त्यांनी विचारात घेतले नाही तसेच हा मतदारसंघ काँग्रेसचा असल्याने काँग्रेसला मिळावा अशी मागणी काँग्रेसने त्यांनी केली होती. परंतु गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेमध्येही सांगली हा मतदारसंघ ठाकरे गटाकडेच राहील यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे काँग्रेस नेत्यांच्या मागणीला काही अर्थ राहिला नाही. यानंतरही काँग्रेस नेत्यांकडून सांगली मतदारसंघासाठी प्रयत्न केले जात होते. परंतु या त्यांना यश आले नाही.त्यामुळे अखेर विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला. ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले आणि त्यांनी काही दिवसांपूर्वी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. या घडामोडीमुळे मतदारसंघात ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत. विशाल पाटील यांनी माघार घ्यावी यासाठी काँग्रेस नेत्यांकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. काँग्रेस नेते विशाल पाटील यांच्या संपर्कात आहेत त्यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे मन वळविण्याचेही प्रयत्न केले जात आहेत. परंतु या दोन्हीतही काँग्रेस नेत्यांना यश येताना दिसत नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.