Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

छोटा राजन जिवंत आहे,9 वर्षांनी समोर आला फोटो :, दाऊदचा सर्वात मोठा शत्रू

छोटा राजन जिवंत आहे,9 वर्षांनी समोर आला फोटो :, दाऊदचा सर्वात मोठा शत्रू 


दिल्लीच्या तिहार जेलमध्ये  कैद असलेला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा  नवा फोटो समोर आला आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी 2015 मध्ये छोटा राजनला परदेशात पकडलं होतं. यानंतर प्रत्यार्पण करत त्याला भारतात आणण्यात आलं होतं. 2015 नंतर समोर आलेला छोटा राजनचा हा पहिला फोटो आहे.

जो फोटो समोर आला आहे तो 2020 मधील आहे. त्यावेळी छोटा राजनचा करोनामुळे मृत्यू झाल्याचे दावे करण्यात आले होते. त्यानंतर हे फोटो समोर आले होते. छोटा राजनचे जे दोन फोटो समोर आले आहेत त्यातील एक फोटो एम्समधील तर दुसरा रुग्णालयातील आहे. छोटा राजन सध्या दिल्लीच्या तिहार जेल क्रमांक 2 मध्ये बंद आहे. येथे सुरक्षेचा कडक पहारा असतो. याच जेलमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही बंद आहेत.

एक काळ असा होता जेव्हा छोटा राजन मोस्ट वाँटेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय होता. त्याने तब्बल दोन दशकं पोलिसांना चकवा दिला होता. 1993 च्या बॉम्बस्फोटानंतर छोटा राजन दाऊदपासून वेगळा झाला होता. छोटा राजन आणि दाऊद इब्राहिम यानंतर एकमेकांचे कट्टर शत्रू झाले होते. याच शत्रुत्वातून मुंबई, दुबई, नेपाळ येथे अनेकांच्या हत्या झाल्या. दाऊदचा खास माणूस असणारा छोटा शकील आजही छोटा राजनवर हल्ल्याच्या प्रयत्नात असतो.

छोटा शकीलने तर छोटा राजनला जाहीर धमकी दिली आहे. त्यात त्याने म्हटलं होतं की, "आपण जोपर्यंत तिहार जेलमध्ये आहोत तोपर्यंत आपण सुरक्षित आहोत असं छोटा राजनला वाटत आहे. पण तो तिहारमध्येच मरणार आहे. कारण आम्ही त्याला तिहार जेलमध्ये मारुन टाकू. डी कंपनी आता छोटा राजनला शत्रूंच्या यादीत ठेवत नाही. तो मेलेला साप आहे".

छोटा राजनला 25 ऑक्टोबर 2015 रोजी इंडोनेशियाच्या बाली शहरातून अटक करण्यात आली होती. एका फोन कॉलमुळे छोटा राजन जाळ्यात अडकला होता. नेहमी व्हीओआयपीवरुन कॉल करणाऱ्या छोटा राजनने 24 ऑक्टोबर 2015 ला व्हॉट्सअप वरुन एक फोन केला. सुरक्षा यंत्रणांनी हा फोन कॉल रेकॉर्ड केला. आपण ऑस्ट्रेलियात सुरक्षित नसून लवकरच येथून जाणार असल्याचं त्याने या फोन कॉलमध्ये सांगितलं होतं. यानंतर इंटरपोलने छोटा राजन देश सोडून जाऊ शकतो असा अलर्ट जारी केला.

25 ऑक्टोबर 2015 ला ऑस्ट्रेलिया फेडरल पोलिसांना एक भारतीय वंशाचा नागरिक बालीसाठी जात असल्याची माहिती मिळाली. यानंतर फेडरल पोलिसांनी इंटरपोलच्या माध्यमातून इमिग्रेशन विभागाला कळवलं आणि बालीमध्ये पोहोचताच छोटा राजनला विमानतळावर अटक करण्यात आली. यानंतर त्याचं तेथून भारतात प्रत्यार्पण करण्यात आलं होतं.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.