Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

फक्त 800 रुपयासाठी करत होत्या 'हे ' काम :, रेल्वेत जवानांनी पकडल्या दोन तरुणी, तब्बल 1,34,54,775 रुपये सापडले

फक्त 800 रुपयासाठी करत होत्या 'हे ' काम :, रेल्वेत जवानांनी पकडल्या दोन तरुणी, तब्बल 1,34,54,775 रुपये सापडले 


कोलकता :पोटाची खळगी भरण्यासाठी काहीही करायला तयार असतो. याच हतबलतेचा गैरफायदा अनेकदा घेतला जातो. दोन तरुणींच्या बाबतीत अशीच हृदयद्रावक घटना घडली आहे. सुरक्षा यंत्रणांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सर्च ऑपरेशनमध्ये या दोन मुली रेल्वेत सापडल्या.



यामध्ये मूळच्या पश्चिम बंगालच्या असलेल्या दोन युवतींना अटक करण्यात आली. तपासात त्यांनी त्यांच्यावर ओढवलेला प्रसंग सांगितल्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या पोटातही गोळा आला होता. सुरक्षा यंत्रणांनी त्या दोन युवतींची चौकशी केली. त्यात असं कळलं, की ज्या गुन्ह्यासाठी त्यांना अटक करण्यात आली, त्यासाठी त्यांना केवळ 800 रुपये मिळत होते आणि तो गुन्हा करवून घेणाऱ्याला प्रत्येक डीलवर लाखो रुपये मिळत होते. त्या तरुणींनी सांगितलं, की त्या 800 रुपयांसाठी त्या दोघींना त्यांनी दिलेला प्रत्येक हुकूम पाळावा तर लागायचाच; पण आपलं सर्वस्व पणाला लावण्याचीही तयारी ठेवावी लागायची.

मूळच्या पश्चिम बंगालच्या असलेल्या या युवतींची नावं पद्मा ऊर्फ जयंती आणि मिठू विस्वास अशी असल्याचं कळलं. या दोघी एकमेकींच्या मावसबहिणी आहेत. त्यांनी सांगितलं, की त्या दोघी श्यामन विश्वासच्या सूचनांनुसार काम करतात. श्यामन त्यांना फोनवरून सांगायचा, की त्यांना कोणत्या ट्रेनच्या कोणत्या कोचमध्ये बसायचं आहे आणि कोणत्या स्टेशनवर उतरून कोणाला भेटायचं आहे. याची माहिती काही मिनिटं आधी फोनवरून दिली जायची.

त्या युवतींनी सांगितलं, की एक ट्रिप पूर्ण झाल्यानंतर त्यांना 800 रुपये दिले जायचे. हे सगळं प्रकरण पश्चिम बंगालमधल्या भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेवरून होणाऱ्या सोन्याच्या तस्करीचं आहे. पद्मा आणि मिठू या दोन्ही युवती बांगलादेशातून सोनं आणून पश्चिम बंगालमधल्या वेगवेगळ्या भागांमध्ये पोहोचवायच्या. बुधवारी (तीन एप्रिल) त्या दोघी असंच एक काम करणार होत्या, तेवढ्यात बीएसएफ अर्थात सीमा सुरक्षा दलाला याबद्दल माहिती मिळाली.

बीएसएफने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण बंगाल फ्रंटियरअंतर्गत येणाऱ्या गेदे बीओपीच्या जवानांनी आरपीएफसह संयुक्त टीम तयार केली. बीएसएफ-आरपीएफच्या संयुक्त टीमने सियालदहला जाणाऱ्या ट्रेनमध्ये एक सिक्रेट सर्च ऑपरेशन राबवलं आणि टीम त्या दोन्ही युवतींपर्यंत पोहोचली. त्यांनी त्या दोघींना मयूरहाट हॉल्ट रेल्वे स्टेशनवर उतरवलं. झडती घेतल्यावर त्यांच्याकडून तब्बल 1,34,54,775 रुपये किमतीचं 1.929 किलो सोनं जप्त करण्यात आलं.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.