बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू येथे झाला. महू पूर्वी महाराष्ट्रात होते. आता तो मध्यप्रदेशचा भाग आहे. आता या भागाला आंबेडकर नगर म्हणून ओळखलं जातं. बाबासाहेब 64 विषयांचे मास्टर होते. त्यांना 9 भाषा येत होत्या. त्यांच्याकडे एकूण 32 डिग्री होत्या. वयाच्या 21 व्या वर्षापर्यंत त्यांनी सर्व धर्मांचा तुलनात्मक अभ्यासही केला होता. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी 8 वर्षाचा अभ्यासक्रम अवघ्या 2 वर्ष आणि 3 महिन्यात पूर्ण केला. लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून डॉक्टर ऑफ सायन्स ही मूल्यवान पदवी मिळवणारे जगातील पहिले आणि एकमेव व्यक्ती आहेत.
बाबासाहेबांचे जगात सर्वाधिक पुतळे आहेत. तसेच जगात सर्वाधिक गाणीही त्यांच्यावरच आहे. शिवाय जगात सर्वाधिक पुस्तके त्यांच्यावरच लिहिली गेली आहेत. 1950 मध्ये त्यांच्या हयातीतच त्यांचा पहिला पुतळा कोल्हापूरमध्ये उभारण्यात आला होता. आंबेडकर हे पहिले भारतीय आहेत की ज्यांचा लंडनच्या संग्रहालयात कार्ल मार्क्स यांच्यासोबत पुतळा आहे.
जगात सर्वत्र गौतम बुद्धाचा पुतळा डोळे मिटलेला आहे. पण आंबेडकरांनी त्यांच्या हाताने डोळे उघडे असलेली बुद्धाची मूर्ती साकारली होती. तिरंग्यावर अशोक चक्र आणण्याचं श्रेय आंबेडकरांचं आहे. 'वेटिंग फॉर व्हिजा' हे आंबेडकरांचं पुस्तक कोलंबिया विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आहे. अर्थशास्त्र, मानव वंशशास्त्र, कायदा आणि भाषा आदी विषयात बाबासाहेब पारंगत होते.
'सांगली दर्पण' परिवारकडून जयंतीच्या शुभेच्छा
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.