Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

छ. संभाजीनगरमधील 'त्या ' 7 जणां च्या मृत्यूला लागले वेगळे वळण

छ. संभाजीनगरमधील 'त्या ' 7 जणां च्या मृत्यूला लागले वेगळे वळण 


छत्रपती संभाजीनगर : कापड दुकानाला आग लागून त्यामध्ये सात जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (ता. ३) पहाटेच्या सुमारास घडली होती. चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मात्र आता या प्रकरणाला वेगळ वळण मिळाले आहे. या आगीच्या घटनाप्रकरणात कापड दुकानाचा मालक शेख अस्लम हा दोषी आढळून आला आहे. त्याच्यावर आता सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

महावितरणच्या वरिष्ठ अभियंत्यांच्या पाहाणीत अस्लमने दुकानामध्ये अत्यंत बेजबाबदारपणे बोगस वायरचा वापर केल्याचे आढळले आहे. त्याशिवाय व्यावसायिक मीटरची थकबाकी न दिल्यानं त्याचे मीटरचे कनेक्श तोडून त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. मात्र तरीही अस्लम घरगुती मीटरवर संपूर्ण दुकान आणि घरात विजेचा वापर करत होता. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दोन तास पाहणी करून रिसर्च रिपोर्ट सादर केला. त्यात अस्लमवर ठपका ठेवण्यात आला आहे. पोलिसांनीच सरकारी पक्षातर्फे फिर्यादी होत गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

अस्लमने त्याची ई-बाइक चार्जिंग करण्यासाठी लावली होती. शिवाय, मध्यरात्री 2 वाजेपर्यंत कपड्याच्या दुकानातील कपडे शिवण्याच्या चार मशीन, ओव्हरलॉकची मशीन सुरू होती. त्यामुळे विजेचा दबाव वाढून शॉर्टसर्किट झाला, त्यामुळे ही आग लागली असा प्राथमिक अंदाज महावितरणचे तज्ज्ञ आणि अग्निशमनच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, या आगीच्या घटनेमध्ये एकूण सात जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये 2 चिमुकल्यांसह, दोन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. आसिम वसीम शेख, (3 वर्ष), परी वसीम शेख (2 वर्ष), वसीम शेख (30 वर्ष), तन्वीर वसीम (23 वर्ष) हमीदा बेगम (50 वर्ष), शेख सोहेल (35 वर्ष) रेश्मा शेख (22 वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.