Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जगातील 'हा ' एकमेव देश जिथे 76 दिवस सूर्य मावळत नाही, कसे असते तेथील जीवन? वाचा...

जगातील 'हा ' एकमेव देश जिथे 76 दिवस सूर्य मावळत नाही, कसे असते तेथील जीवन? वाचा...


पृथ्वीवरील दिवस आणि रात्र या दोन मोठ्या खगोलीय घडामोडी आहेत. 24 दिवसांचा एक दिवस असतो. 12 तास प्रकाश आणि 12 तास अंधार असतो. विषुववृत्ताच्या ठिकाणी असलेल्या देशांमध्ये हा दिवस आणि रात्र समान असते.


दक्षिण गोलार्ध आणि उत्तर गोलार्धाला विषुववृत्त हे दोन भागात विभाजित करते. परंतु दक्षिण आणि उत्तर गोलार्धात रात्र आणि दिवस समान नसतो याला कारण पृथ्वीचा कललेला भाग आणि गोलाकार रचना. गोलार्धाच्या भागात आपल्याला ही थोडी सपाट दिसते. त्यामुळे येथे दिवस आणि रात्र आपल्याला काहीशी असमान झालेली पाहायला मिळते. 

असा एक देश याच उत्तर गोलार्धाच्या भागात आहे जिथे तब्बल 76 दिवस सकाळ म्हणजे सूर्यप्रकाश असतो आणि हा देश म्हणजे नोर्वे. येथे फिरण्यासाठी अनेक पर्यटक हे उत्साही असतात. कारण त्यांनाही हा विलक्षण अनुभव घ्यायचा असतो. हा देश लोकप्रिय आहे. येथे दिवस हा तब्बल सहा महिने असतो आणि रात्र तब्बल 40 मिनिटे असते. त्यामुळे या देशाचे वैशिष्ट्ये हे फारच खास आहे. तेव्हा आपण याच आगळ्यावेगळ्या खगोलीय घटनेबद्दल जाणून घेणार आहोत. जर येथे सहा महिने सूर्यप्रकाश असतो तर मग येथे जीवन कसे असते? काय आहे याची खासियत? 

नोर्वे येथे रात्री 12.43 वाजता सूर्य मावळतो आणि बरोबर 40 मिनिटांनी तो परत उगवतो. गंमत म्हणजे 1.30 झाले की येथे सकाळ होते आणि पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होतो. या कारणामुळे नोर्वे या देशाला कंट्री ऑफ मिडनाईट सन असे म्हटले जाते कारण येथे मध्यरात्री सूर्य उगवतो. आर्क्टिक सर्कल म्हणजे उत्तर गोलार्धात हा देश येतो. 10 एप्रिल ते 23 ऑगस्टगदरम्यान येथे सूर्य जश्याचा तसा असतो आणि तो मावळत नाही. नॉर्वेच्या हॅमरफेस्ट शहरात अनोखा नजरा पाहायला मिळतो. येथील सौंदर्यही फार उद्भूत आहे. येथे राहणारी लोकं ही 76 दिवस सूर्यप्रकाशात राहतात. हा देश डोंगरदऱ्यांनी वेढलेला आहे. 

येथील जीवनही अगदी तुमच्या आमच्यासारखे आहे. येथील कोस्ट ऑफ लिव्हिंग फार जास्त आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, येथेही 24 तासांचेच घड्याळ वापरले जाते. येथे अनेक परदेशी पर्यटकही येताना दिसतात. हा देशही फार मोठा आहे आणि निसर्गानं अद्भूत आणि रोमाचंकारी आहे, हे नक्की!

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.