छत्रपती संभाजीनगरच्या छावणी परिसरात कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. यामध्ये दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या 7 जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन मुलांचाही समावेश आहे. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. हे ककड्याचे दुकान छावणी दाना बाजार गल्लीतील महावीर जैन मंदिरच्या बाजूला होते.
एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगर शहरात आगीच्या घटनेत एकाच वेळी सात जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. शहरातील छावणी परिसरातील जैन मंदिराजवळ असलेल्या एका तीन मजली इमारतीला मध्यरात्री अचानक आग लागली. या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. मृतदेह शासकीय घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले असून पोलिसांकडून पंचनामा केला जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.