राहुरी येथील पूर्ण झालेल्या कामाचे देयक देण्यासाठी ६२ हजाराच्या लाच प्रकरणात पाटबंधारे विभागाच्या दोन महिला अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्या. १८ टक्के प्रमाणे ६२ हजार रुपये पहिला हप्ता घेतांना एसीबीने एका महिला अधिका-याला रंगेहात पकडले तर दुस-याने दुजोरा दिल्यामुळे तोफखाना पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांच्या कार्यक्षेत्रातील उंबरे,ता.राहुरी येथील पूर्ण झालेल्या कामाचे देयक 7,75,963/-रु अदा केले म्हणून सदर कामाच्या अदा केलेल्या बिलाचे यातील आलोसे 1 श्रीमती शेख यांनी स्वतः साठी 8 टक्के प्रमाणे व आलोसे 2 यांचे करिता 10 टक्के प्रमाणे असे एकूण 18 टक्के प्रमाणे 1,39,500/- रुपये लाचेची मागणी करत असले बाबतची तक्रार ला.प्र.वि.अहमदनगर कडे आज दिनांक 18/04/2024 रोजी प्राप्त झाली होती. त्यानुसार आज दिनांक 18/04/2024 रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली असता सदर लाच मागणी पडताळणी दरम्यान श्रीमती रुबिया शेख यांनी तक्रारदार यांच्याकडे सदर कामाचे अदा केलेल्या बिलाच्या रकमेचे स्वतःसाठी 8 टक्के प्रमाणे व 2 श्रीमती पाटील यांच्याकरिता 10 टक्के प्रमाणे असे एकूण 18 टक्के लाचेची मागणी करत असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार आज दिनांक 18/04/2024 रोजी श्रीमती रुबिया शेख यांचे विरुद्ध सापळा कारवाई आयोजित करण्यात आली, सदर सापळा कारवाई मध्ये रुबिया शेख यांनी 18 टक्क्यांच्या पहिला हप्ता म्हणून 62,000/- रुपये पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडुन स्वीकारले, त्यावेळी त्यांना लाच रकमेसह रंगेहात पकडण्यात आले आहे. तसेच सदर लाच रक्कम स्वीकारणेस रजनी पाटील यांनी दुजोरा दिला म्हणून श्रीमती रुबिया शेख व रजनी पाटील यांचे विरुद्ध तोफखाना पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
यशस्वी सापळा कारवाई
युनिट -अहमदनगर.
तक्रारदार- पुरुष,वय- 45 वर्ष
*आलोसे- श्रीमती रुबिया मोहम्मद हनिफ शेख, वय-35 वर्ष, पद-सहायक अभियंता,वर्ग-1,
नेमणूक- पाटबंधारे संशोधन व जल नि:सारन उप विभाग, अहमदनगर,
जि.अहमदनगर
रा.प्लॉट नं.365,गाढेकर चौक,निर्मल नगर, अहमदनगर
2)श्रीमती रजनी पाटील,
कार्यकारी अभियंता,वर्ग-1
पाटबंधारे संशोधन विभाग,MERI,
दिंडोरी रोड, नाशिक
रा.603,हरी आमंत्रण,कबरा सरी च्या समोर,दत्त मंदिर रोड,नाशिक रोड,नाशिक
*लाचेची मागणी- दि.18/04/2024 एकूण 7,75,000/- रु.
अदा बिलाच्या रकमेचे 18 टक्के प्रमाणे 139,500/-रुपये
*लाच स्विकारली- दिनांक-18/04/2024 रोजी 18 टक्के रकमेचा पहिला हप्ता म्हणून 62,000/-रुपये.
हस्तगत रक्कम- 62,000/-रुपये
लाचेचे कारण-यातील तक्रारदार यांच्या कार्यक्षेत्रातील उंबरे,ता.राहुरी येथील पूर्ण झालेल्या कामाचे देयक 7,75,963/-रु अदा केले म्हणून सदर कामाच्या अदा केलेल्या बिलाचे यातील आलोसे 1 श्रीमती शेख यांनी स्वतः साठी 8 टक्के प्रमाणे व आलोसे 2 यांचे करिता 10 टक्के प्रमाणे असे एकूण 18 टक्के प्रमाणे 1,39,500/- रुपये लाचेची मागणी करत असले बाबत ची तक्रार
ला.प्र.वि.अहमदनगर कडे आज दिनांक 18/04/2024 रोजी प्राप्त झाली होती.
त्यानुसार आज दिनांक 18/04/2024 रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली असता सदर लाच मागणी
पडताळणी दरम्यान आलोसे क्र 1 श्रीमती रुबिया शेख यांनी तक्रारदार यांच्याकडे सदर कामाचे अदा केलेल्या बिलाच्या रकमेचे स्वतःसाठी
8 टक्के प्रमाणे व आलोसे क्र.2 श्रीमती पाटील यांच्याकरिता 10 टक्के प्रमाणे असे एकूण 18 टक्के लाचेची मागणी करत असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार आज दिनांक 18/04/2024 रोजी आलोसे क्र.1 श्रीमती रुबिया शेख यांचे विरुद्ध सापळा कारवाई आयोजित करण्यात आली, सदर सापळा कारवाई मध्ये आलोसे क्र.1 रुबिया शेख यांनी 18 टक्क्यांच्या पहिला हप्ता म्हणून 62,000/- रुपये पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडुन स्वीकारले, त्यावेळी त्यांना लाच रकमेसह रंगेहात पकडण्यात आले आहे. तसेच सदर लाच रक्कम स्वीकारणेस आलोसे क्रमांक 2 श्रीमती रजनी पाटील यांनी दुजोरा दिला म्हणून आलोसे क्र.1 श्रीमती रुबिया शेख व आलोसे क्र.2 रजनी पाटील यांचे विरुद्ध तोफखाना पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
सापळा अधिकारी**
श्री.प्रवीण लोखंडे पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. अहमदनगर.* मो.नं.7972547202
सहायक सापळा अधिकारी
श्री.शरद गोर्डे,
पोलिस निरीक्षक,
ला.प्र.वि.अहमदनगर
मो.नं.7719044322
सापळा पथक
1) पोलीस अंमलदार- रवींद्र निमसे,बाबासाहेब कराड,किशोर लाड महिला पोलीस अंमलदार राधा खेमनर,सना सय्यद.चालक पोलीस अंमलदारहरून शेख
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.